'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला' By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 4:43 PM
1 / 9 देशभरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात येत आहे. गावांपासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र गोविंदांची धूम पाहायला मिळत आहे 2 / 9 मुंबईत मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मुंबईतील उंचच-उंच थर पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे. 3 / 9 उंचच उंच मनोर रचून प्रत्येक दहीहंडी मंडळ आपली कलाबाजी अन् कसरत दाखवत आहे. 4 / 9 मुंबईची दहीहंडी असावी अन् सेलिब्रिट नसावेत हे कसं शक्यय. मुंबईच्या दहीहंडीत बिग बॉस विजेती मेधा धाडे अन् महेश मांजरेकर यांची उपस्थिती. 5 / 9 मुंबईत दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे, मनोरे रचून गोविंदा हंडी फोडण्यासाठी थर रचत आहे. मुंबईत 12 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे. 6 / 9 दहीहंडी उत्सवात विविध ढोल-जहाँज पथके आणि हंडी फोडण्यासाठी मंडळांनी सहभाग घेतला आहे. 7 / 9 दहीहंडी पथकातही कुठं छत्रपती शिवाजी महाराज तर कुठे तिरंगा ध्वज फडकत आहे, हंडी फोडण्याची उत्साह गोविंदांसह प्रत्येक नागरिकांमध्येही जाणवतोय. 8 / 9 दिग्दर्शक फराह खान यांनी आपली मुलगी दिवा हिचा राधाप्रमाणे लूक केला आहे. फराह यांची राधा ही बावरी... 9 / 9 आपल्या चिमुकल्या गोविंदाला शाळेत घेऊन जाताना मुस्लीम दाम्पत्य, ना हिंदुंचा ना मुस्लीमचा हा सोहळा भारतीय उत्सवाचा आणखी वाचा