By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:34 IST
1 / 6महापालिका म्हणजे नेमके काय? तिथे काय आणि कसे कामकाज चालते? नगरसेवकांकडे कोणती जबाबदारी व कामे असतात? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील. चला तर मग समजून घेऊयात.2 / 6नगरसेवक म्हणजे काय? तर मुंबई महानगरपालिकेत (पूर्वी बॉम्बे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन) नगरसेवकपदाची पायाभरणी ब्रिटिश काळात झाली. १८६५ च्या बॉम्बो म्यूनिसिपल अॅक्टनुसार शहर प्रशासनात नागरिकांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले. १८८८ च्या बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्टमुळे आजच्या स्वरूपातील महानगरपालिकेची रचना स्पष्ट झाली आणि निवडून आलेल्या सदस्यांना नगरसेवक संबोधले जाऊ लागले व नगरसेवकपद अस्तित्वात आले.3 / 6नगरसेवकाची प्रमुख जबाबदारी कोणती ? : निवडून आलेला प्रत्येक नगरसेवक त्याच्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो आणि दैनंदिन नागरी प्रश्नांवर काम करतो. विकासकामांचे प्रस्ताव मांडणे, पालिका प्रशासनाशी समन्वय साधणे आणि नागरिकांच्या समस्या सभागृहात मांडणे ही नगरसेवकाची प्रमुख जबाबदारी असते.4 / 6नगरसेवकाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात? : नगरसेवक हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. मूलभूत सेवा-सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा नागरिकांची असते. जसे पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, गटार व्यवस्था, स्वच्छता, स्ट्रीटलाइट इत्यादी. तक्रारींचे वेळेवर निराकरण, विकासनिधीचा पारदर्शक वापर, प्रभागातील प्रश्नांची सभेत प्रभावी मांडणी आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क या बाबी महत्त्वाच्या आहेत.5 / 6नगरसेवकाच्या अखत्यारीत कोणती कामे? : स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा उभारणे व देखभाल करणे, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य केंद्रे व शाळांबाबत निर्णय प्रक्रियेत सहभाग, उद्याने व सामुदायिक सुविधा विकसित करणे आणि वार्ड विकास निधीचा योग्य वापर ही नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रातील कामे आहेत.6 / 6कोणती कामे नगरसेवक करू शकत नाही? : स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा उभारणे व देखभाल करणे, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य केंद्रे व शाळांबाबत निर्णय प्रक्रियेत सहभाग, उद्याने व सामुदायिक सुविधा विकसित करणे आणि वार्ड विकास निधीचा योग्य वापर ही नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रातील कामे आहेत.