शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी'; अमित शाह यांचं नाशिकमध्ये देवदर्शन, यात्रेत झाले सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:34 IST

1 / 7
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी (२४ जानेवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मालेगाव आणि मुंबईत झालेल्या कार्यक्रमांना अमित शाहांनी हजेरी लावली.
2 / 7
या दौऱ्यात अमित शाह यांनी नाशिक जिल्ह्यात देवदर्शनही केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ज्येष्ठ बंधू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रा उत्सवातही शाह सहभागी झाले.
3 / 7
दर्शनाचे फोटो शेअर करत शाह यांनी म्हटले की, 'आज त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर येथे वारकरी संप्रदायाने आयोजित केलेल्या श्री निवृत्तीनाथ यात्रा उत्सवात सहभाग घेतला.'
4 / 7
'संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ज्येष्ठ बंधू श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी वैष्णव भक्तीच्या प्रचार आणि प्रसारात अमूल्य योगदान दिले. सुमारे ७०० वर्षांपूर्वी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांच्या स्मृती निमित्त आयोजित या यात्रा उत्सवात सहभाग घेऊन आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेतला', अशा भावना शाह यांनी व्यक्त केल्या.
5 / 7
त्यानंतर अमित शाह यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. याठिकाणी त्यांनी सपत्नीक पूजा, आरती केली.
6 / 7
'आज नाशिक (महाराष्ट्र) येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन-पूजन करुन देशवासियांचे सुख, शांती आणि समृद्धीची कामना केली', असे शाह म्हणाले.
7 / 7
सहकार खात्याशी संबंधित एका कार्यक्रमासाठी अमित शाह हे मालेगाव येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे गिरीश महाजन होते. देवदर्शन करुन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
टॅग्स :Amit Shahअमित शाहNashikनाशिकJyotirlingaज्योतिर्लिंगHome Ministryगृह मंत्रालय