शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2018 : यंदाच्या दिवाळीत असं सजवा आपलं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 4:12 PM

1 / 7
दिवाळी हा आनंदाचा सण. प्रत्येकाच्या घरात फराळ, रांगोळ्या, सजावटीची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाच्या दिवाळीला तुम्ही हटके पद्धतीने घराची आकर्षक सजावट करू शकता. दिवाळीत घर कसं सजवायचं हे जाणून घेऊया.
2 / 7
दिवाळीत फुलांनी केलेली सजावट ही विशेष लक्ष वेधून घेते. आपण दारावर रंगीबेरंगी फुलांचे सुंदर तोरण लावू शकतो. तसेच घरामध्ये फुलांच्या माळा लावून घर सुंदररीत्या सजवू शकतो.
3 / 7
घराबाहेर काढलेली सुंदर रांगोळी घराची शोभा वाढवते. वेगवेगळ्या रंगांची, फुलांची रांगोळी ही प्रामुख्याने दिवाळीत काढली जाते. रांगोळीचा साचा किंवा छापा वापरून सध्या झटपट रांगोळी काढता येते.
4 / 7
दिवाळी हा खऱ्या अर्थाने दिव्यांचा सण. दिव्यांनी आपण आपलं घर उजळवतो. बाजारात आकर्षक पणत्या उपलब्ध आहेत. तसेच फ्लोटींग कॅन्डलचा वापर करू शकतो.
5 / 7
दिवाळी आली का प्रत्येकाच्या घरी सुंदर आकाश कंदील पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या आकर्षक आकाश कंदीलांना विशेष मागणी आहे. घराच्या घरीही तुम्ही सुंदर आकाश कंदील तयार करू शकता.
6 / 7
दिवाळीत देवघराची सजावट केल्याने मन प्रसन्न होते. फुलं, रांगोळी, तोरण, दिवे, पणती या सर्व गोष्टीचा वापर करून हवी तशी सजावट करता येते.
7 / 7
दिवाळीत प्रत्येकाच्या घराला किंवा इमारतीला आवर्जून आकर्षक विद्यूत रोषणाई केली जाते. इलेक्ट्रिक लाईट्सचा वापर करून सजावट केल्यास घर अत्यंत सुंदर दिसते. बाजारात लाईट्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
टॅग्स :Diwaliदिवाळी