शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोनाल्डोचे फॅन तेही आपल्या कोल्हापुरात! साहेबांचा वाढदिवस साजरा केला धुमधडाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 20:08 IST

1 / 10
कोल्हापुरकरांचं फुटबॉलवरचं प्रेम म्हणजे जगावेगळं आहे. आख्खा देश क्रिकेटवेडा आहे पण कोल्हापूर मात्र फुटबॉलवर प्रेम करतात. या शहरात मेस्सी, रोनाल्डो, नेमार या खेळाडूंचे तुम्हाला लाखो चाहते मिळतील.
2 / 10
आज क्रिस्टियानो रोनाल्डो याचा चाळीसावा वाढदिवस होता. रोनाल्डो प्रेमींची संख्याही कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा केला जातो. त्या पद्धतीनेच कोल्हापूरातील फुटबॉल प्रेमी तरुण वाढदिवस साजरा करतात.
3 / 10
आज रोनाल्डोचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. कोल्हापूरात 'क्रिस्तीआनो साहेब परिवार' नावाचा एक ग्रुप आहे. ते प्रत्येक वर्षी रोनाल्डोचा वाढदिवस साजरा करतात.
4 / 10
रोनाल्डोच्या वाढदिवसानिमित्त या ग्रुपने कोल्हापूर महानगरपालिका शाळेत खेळाचे साहीत्य वाटप करण्यात आले.
5 / 10
यामध्ये क्रिकेटची बॅट, बॉल, फुटबॉल अशा वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
6 / 10
तसेच जगप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो ची शारीरिक मेहनत व समाजभावनेची प्रेरणा घेत रक्तदान शिबीर व वृक्षारोपण ही आयोजीत करण्यात आले.
7 / 10
कोल्हापुरातील 'क्रिस्तीआनो साहेब परिवार' ग्रुपच्या वतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला असून या वाढदिवसाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
8 / 10
क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडं कोल्हापूर अशी शहराची ओळख आहे. येथील पेठापेठा मध्ये फुटबॉल प्रेमी पाहायला मिळतात. येथे प्रत्येक पेठाचे संघ आहेत आणि मोठ मोठे सामने देखील येथे रंगत असतात.
9 / 10
ज्या पद्धतीने क्रिकेट मधील खेळाडूंवर चाहते प्रेम करतात. त्याच पद्धतीने कोल्हापूरात फुटबॉल खेळाडूंवर चाहते प्रेम करतात.
10 / 10
फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा ४० वा वाढदिवस पार पडला तर कोल्हापुरातील रोनाल्डो चाहत्यांनी रोनाल्डोचा वाढदिवस कोल्हापुरी स्टाईलने दणक्यात साजरा केला आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉलCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो