1 / 7अमेरिकेत एका प्रेग्नंट महिलेची डिलिव्हरी विमानात झाल्याचा प्रकरा समोर आला आहे. विशेष म्हणजे बाळाला जन्म दिलेल्या या महिलेला आपण प्रेग्नंट असल्याची कल्पनाही नव्हती.2 / 7ही महिला विमानानं लेक सिटीहून होनोलूलू येथे जात होती. एका टिकटॉक व्हिडीओनंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 3 / 7लेविनिया मोंगा नावाच्या महिलोचं हे बाळ प्रिमॅच्यूअर आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लेविनियाने आपल्या प्रेग्नेंसीच्या २६ ते २७ आठवड्यानंतर या बाळाला जन्म दिला आहे. 4 / 7आता लेविनिया आणि तिचे बाळ पूर्णपणे सुरक्षित आहे. विमानात बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेनं सोशल मीडियावर माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. 5 / 7लेविनियाच्या डिलीव्हरी व्हिडीओ एका टिकटॉक व्हिडीओ नंतर व्हायरल झालाय हा व्हिडीओ जुलिया हैंसन नावच्या एका महिलेनं बनवला होता. अमरिकेतील रहिवासी असलेल्या जुलियानं सांगितले की, 'एका गर्भवती महिलेला विमानात येऊच कसं दिलं.'6 / 7जुलियानं व्हिडीओमध्ये पुढे सांगितले की, ही महिला आपल्या वडीलांसह मागे बसली होती. लेविनियाला ती प्रेग्नंट असल्याची कल्पना नव्हती. क्रु मेंमर्सच्या म्हणण्यानुसार आम्हाला माहिती होतं की, या फ्लाईटमध्ये एका महिलेची डिलिव्हरी झाली आहे. आम्ही तिच्या हिमतीची दाद देतो, अशा प्रकारे या महिलेला शुभेच्छा देण्यात आल्या.7 / 7याबाबत डेल्टा एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ''आमचे ग्राहक आणि क्रु मेंमर्सची सुरक्षा प्राथमिकता असते. आमचा स्टाफ वैद्यकिय आपातकालीन स्थिती सांभाळण्यास सक्षम आहे. तसंच सगळ्या सुविधाही उपलब्ध आहेत.'' हवाई डिपार्टमेंट ऑफ ट्रांसपोर्टेशनचे प्रवक्ता जय कनिंगहेम यांनी सांगितले की, ''याबाबतीत पायलट आणि क्रु मेंमर्स यांनी प्रोटोकॉल्सचं पालन केलं आहे. आपातकालीन स्थितीत महिला आणि लहान मुलांची काळजी घेण्यात आली त्यानंतर लँडिंग करण्यात आले.''