शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिलेने कॅन्सरचं खोटं कारण सांगत मित्रांकडून लाटले ८ लाख रूपये, मात्र एका चुकीने झाला तिचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 2:54 PM

1 / 8
आजकाल दररोज फसवणुकीची इतकी प्रकरणे समोर येत असतात की, कुणावर विश्वास ठेवायचा की नाही असा विचार येतो. लालची लोक दुसऱ्यांच्या भावनांशी खेळून आपला स्वार्थ पूर्ण करून घेतात. त्यामुळे बरेचजण गरजू लोकांची मदत करायला मागे पुढे बघतात. अशीच एक फसवणुकीची घटना इंग्लंडमधून समोर आली आहे. इंग्लंडच्या चेशायरमध्ये राहणाऱ्या टोनी स्टॅन्डेनने तिला कॅन्सर आपल्याचं सांगत मित्रांचीच फसवणूक केली. तिने कॅन्सरच्या नावावर आपल्या मित्रांकडून आठ लाख रूपये मिळवले आणि शाही लग्न केलं. आपल्या मित्रांना कॅन्सर नसल्याचं कळू नये म्हणून तिने टक्कलही केलं होतं. पण तिच्याकडून एक अशी चूक झाली की, सगळा भांडाफोड झाला. एका फोटोमुळे तिचा सगळा कारनामा उघड झाला. आता या महिलेवर तुरूंगात जाण्याची वेळ आलीय.
2 / 8
टोनीला नेहमीच ग्रॅड लग्न करण्याची इच्छा होती. तिचं स्वप्न होतं की, सिनेमात दाखवतात तसं व्हावं. पण तिच्याकडे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे नव्हते. मग तिने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्लॅन केला.
3 / 8
टोनीने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट टाकली. ज्यात तिने लिहिले होते की, तिला कॅन्सर आहे. डॉक्टरांनी सांगितले की, जर वेळी उपचार केले गेले नाही तर ती २ महिनेच जगणार आहे. तिने लिहिले की, तिला ट्यूमर झाला आहे आणि तिच्या शरीरातील अवयव निकामी होत आहेत.
4 / 8
त्यानंतर तिने इन्स्टावर काही विना मेकअपचे फोटो शेअर केलेत. जेणेकरून ती आजारी दिसावी. आपल्या मैत्रीणीची ही स्थिती बघून टोनीच्या मित्रांनी तिच्यासाठी पैसे जमा करणे सुरू केले.
5 / 8
आता टोनीने मित्र तिच्यावर विश्वासघाताचा आरोप लावत आहेत. तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाईनंतर टोनी तुरूंगाची हवाही खावी लागू शकते.
6 / 8
कॅन्सरसाठी जमा झालेल्या पैशातून टोनीने ५२ वर्षीय बॉयफ्रेन्डसोबत लग्न केलं. तिने तिच्या स्वप्नातील लग्नासारखं लग्न केलं. नंतर कपल तुर्कीला गेलं. त्यांनी सोशल मीडियावर दोघांचे काही फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून टोनीच्या मित्रांना संशय आला.
7 / 8
त्यानंतर टोनीने इन्स्टावर ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली. तेव्हा तिच्या मित्राचा संशय अधिक वाढला. त्यांनी लगेच कॅन्सर हॉस्पिटलमधून टोनीचे डीटेल्स मागवले आणि तेव्हा तिचा सगळा भांडाफोड झाला.
8 / 8
आता टोनीने मित्र तिच्यावर विश्वासघाताचा आरोप लावत आहेत. तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाईनंतर टोनी तुरूंगाची हवाही खावी लागू शकते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय