शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो! दरवाजा उघडताच पतीसोबत दिसली त्याची प्रेयसी; पत्नीने दोघांनाही धू-धू धुतले, व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 15:52 IST

1 / 8
लॉकडाऊनमुळे कितीतरी विचित्र आणि आश्चर्यकारक घटना समोर आल्या आहेत. अनेक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स उघड झाली आहेत. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीला दोन मुली झाल्या म्हणून पती तिला सोडून गेला आणि प्रेयसीसोबत राहू लागला.
2 / 8
वर्षभर प्रयत्न करूनही पत्नीला न्याय मिळाला नाही तर तिने पतीच्या घरी जाऊन त्याच्यासह त्याच्या प्रेयसीचीही धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
3 / 8
राजस्थानच्या बारां जिल्ह्यातील ही घटना आहे. बारांमध्ये एका पत्नीने कंपाउंडर पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ त्याच्या घरात पडकडं. यावेळी पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीला चांगलाच चोप दिला.
4 / 8
दरम्यान, गेल्या एक वर्षापासून पीडिता अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत होती. पण न्याय मिळत नव्हता. त्यामुळे ती परेशान झाली होती. आता तिने हिंमत करून प्रेयसीसोबत पतीचीही धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
5 / 8
इतकेच नाही तर पत्नीने प्रेयसीला बेदम मारहाण केली. हे पाहून पती टेरेसवर पळू लागला होता. पण पत्नीने त्याला धरलं आणि चांगलाच चोप दिला.
6 / 8
पीडित महिलेचा पती प्रेयसीसोबत बारां गावातील नाकोडा कॉलनीमध्ये घर घेऊन राहू लागला होता. इथे दोघेही मौजमजा करत होते.
7 / 8
पीडित पत्नीचं लग्न 2006 मध्ये झालं होतं. ज्यानंतर तिने दोन मुलींना जन्म दिला. त्यानंतर पतीने तिला सोडलं आणि तो प्रेयसीसोबत राहू लागला.
8 / 8
दरम्यान, गेल्या एक वर्षापासून पीडिता अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत होती. पण न्याय मिळत नव्हता. त्यामुळे ती परेशान झाली होती. आता तिने हिंमत करून प्रेयसीसोबत पतीचीही धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेRajasthanराजस्थान