शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टायरचा रंग काळाच का असतो? इतर कोणत्याही रंगाचे टायर का नसतात? जाणून घ्या रंजक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 6:23 PM

1 / 10
आपल्या आजूबाजूला अनेक वाहान तुम्ही पाहिली असतील. यामध्ये कार, ट्रक, विमान आणि बस इत्यादी येतंच. त्याने तुम्ही प्रवास देखील केला असावा.
2 / 10
परंतू तुम्ही कधी या वाहानांच्या चाकांबद्दल विचार केलाय? गाडीचं चाक किंवा टायर हे गाडीच्या महत्वाच्या भागांपैकी एक आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही एक पाऊल देखील पुढे जाऊ शकत नाही.
3 / 10
तसे पाहाता चाकांचा आकार आणि जाडी वेगवेगळी असते आणि वेगवेगळ्या वाहानांसाठी वेगवेगळे टायर लावले जातात.
4 / 10
गाड्यांच्या टायर्सचा रंग हा काळाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला का की टायर्सचा रंग काळाच असण्यामागचे कारण काय?
5 / 10
हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्याचा धक्का बसेल की, १२५ वर्षांपूर्वी टायर्स पांढऱ्या रंगात बनवले जात होते.
6 / 10
टायर्स तयार करण्यासाठी ज्या प्रकारच्या रबराचा वापर केला जातो, त्याचा रंग मिल्की व्हाईट असतो. परंतु तो पदार्थ एक ऑटोमोबाइलचा भार झेलू शकेल इतका मजबूतही नसतो आणि रोड्सवर उत्तम प्रकारे कामगिरी करु शकेल असाही नसतो.
7 / 10
यासाठीच मिल्की व्हाईट रबराला आणखी मजबूत करण्यासाठी काही पदार्थ एकत्र केले जातात. त्यात ब्लॅक कार्बनचा (Black Carbon) समावेश असतो.
8 / 10
यामुळे टायरचा रंग काळा होतो तसेच टायर मजबूत होतं आणि दिर्घकाळ टिकतं.
9 / 10
तसेच कार्बनमुळे ऑटोमोबाइल पार्ट्सच्या आतील गरमी कमी होते. यामुळेच जेव्हा रस्ते गरम असतात तेव्हा टायर्स वितळत नाहीत.
10 / 10
याशिवाय कार्बनमधील ब्लॅक सबस्टन्स टायर्सला युव्ही रेडिएशनपासूनही सुरक्षित ठेवतो. टायर्स मजबूत असणं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे टायर्स निवडताना ते किती मजबूत आहे, त्याचं लाइफ आणि विश्वासार्हता पडताळून पाहणं आवश्यक आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके