शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सापांची जीभ दोन भागात का विभागलेली असते? 99 टक्के लोकांना माहीत नसेल 'या' प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:49 IST

1 / 9
Snake Interesting Facts : साप आपण प्रत्यक्षात अनेकदा बघितले असतील. सरसर सरपटणारा साप पाहिला की, नक्कीच अंगावर काटा येतो. सापाचा फणा आणि सरसर बाहेर येणारी जीभ पाहिली तर मग विचारायलाच नको. सापाची जीभ आपण कधीना कधी पाहिली असेलच, तेव्हा लक्षात आलं असेल की, ही जीभ दोन भागात विभागलेली असते. पण कधी प्रश्न पडलाय का की, जास्तीत जास्त प्राण्यांची जीभ ही सरळ एकत्र मनुष्यांसारखी असते. पण मग सापांची जीभ का अशी दोन भागात विभागलेली असते? तेच आज आपण समजून घेणार आहोत.
2 / 9
यूनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टीकटमध्ये इकोलॉजी आणि इव्हॉल्यूशनरी बायोलॉजीचे प्राध्यापक कर्ट श्वेंक म्हणाले की, सापांची जीभ दोन भागात विभागण्याची कहाणी डायनासॉरच्या काळापासून सुरू होते. ही बाब आहे साधारण १८ कोटी वर्षाआधीची. आपल्या भव्य आणि भयावह डायनासॉरच्या पायाखाली येऊ नये म्हणून साप मातीतील खड्ड्यांमध्ये किंवा बिळात लपून रहायचे. सापांच शरीर लांब, बारीक आणि सिलेंडरसारखं असतं. त्यांना पाय नसतात. प्रकाश नसेल तर त्यांना धुसर दिसतं. सापांची जीभ त्यांच्यासाठी नाकाचं काम करते. ते गंध घेण्यासाठी जीभ हवेत फिरवतात.
3 / 9
फ्रान्सचे वैज्ञानिक बर्नार्ड जर्मेन डे लेसेपेडे यांनी सांगितलं होतं की, अॅरिस्टॉटल यांचं मत होतं की, सापांची दोन भागात विभागलेली जीभ टेस्टचा डबल आनंद घेण्यासाठी असते. १७व्या शतकातील वैज्ञानिक जियोवानी बॅटिस्टा होडिर्ना यांचं मत होतं की, साप आपल्या जिभेने माती उचलतात. कारण त्यांना सतत जमिनीवरून सरपटत जायचं असतं. तर इतर वैज्ञानिकांचं मत होतं की, ते आपल्या जिभेने कीटकांना पकडतात.
4 / 9
एक मजेदार थेअरीही होती की, साप आपल्या जिभेने दंश मारतात. असं मानलं जातं की, ही चुकीची माहिती प्रसिद्ध लेखक शेक्सपिअर यांनी आपल्या कहाण्यांमधून लोकांमध्ये पसरवली होती. त्यांचं मत होतं की, साप आपल्या जिभेने दुश्मनांना मारतात. तेच फ्रान्सचे नॅच्युरलिस्ट जीन बॅपटिस्टे लॅमार्क याचं थोडं योग्य कारण सांगितलं होतं. लॅमार्क सांगत होते की, साप आपल्या जिभेने काही गोष्टींची जाणीन करून घेतात. कारण त्यांना कमी प्रकाशात कमी दिसतं. लॅमार्क यांची ही थेअरी 19व्या शतकापर्यंत सत्य मानली जात होती.
5 / 9
सापांच्या दोन भागात विभागलेल्या जिभेचं खरं काम 1900 नंतर समजलं. सापाच्या जिभेला वोमेरोनेजल असं म्हणतात. हा अवयव अनेक अशा जीवांमध्ये आढळतो जे जमिनीवर सरपटत जातात. केवळ माकडांच्या पूर्वजांमध्ये आणि मनुष्यांमध्ये असं नसतं. वोमेरोनेजल अवयव सापाच्या नाकाच्या चेंबरखाली असतो. साप जिभेच्या दोन्ही भागांना गंध ओखळणारे कण त्यावर चिकटवून हवेत काढतात. या कणांना गंध चिकटतो. यावरून सांपाना कळतं की, आजूबाजूला किंवा समोर काय आहे. किंवा काय होऊ शकतं.
6 / 9
सापांच्या जिभेवर असणारे हे कण गंध ओखळून सापाच्या तोडांत जातात. याने सापाच्या मेंदूला संदेश जातो की, समोर काय आहे किंवा काय होऊ शकतं. समोर धोका आहे की, काही खाण्यासाठी. साप जास्तीत जास्त जीभ बाहेर काढतात. जेणेकरून लाबंपर्यंतच्या एरियाची त्यांना माहिती मिळावी.
7 / 9
जिभेच्या दोन वेगवेगळ्या भागांवरून वेगवेगळे गंध जाणून घेऊ शकतात. साप गंध चिकटवणाऱ्या कणांना जिभेच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पाठवतात. ही त्याचप्रमाणे काम करते जसे आपले कान. कान वेगवेगळ्या दिशेने येणारे आवाज समजू शकतात. आवाजावरून दिशेचीही माहिती मिळवू शकतो. याचप्रमाणे साप जिभेच्या माध्यमातून धोक्याची माहिती घेतात. जेवणाचा शोध घेतात आणि प्रजननासाठी मादा सापाचा शोध घेतात.
8 / 9
पालींसारखी सापांची जीभ काम करते. अनेकदा तर जिभेचा एक भाग वर तर कधी दुसरा खाली असतो. जीभ गंध आपल्याकडे खेचते. दोनपैकी एकाही जिभेच्या भागावर गंध चिकटला तर याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो.
9 / 9
जिभेच्या दोन्ही भागाचा सापांना खूप फायदा होतो. त्यांना हे कळतं की, कोणत्या दिशेने जाणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि कोणत्या दिशेने धोका असेल. त्यांची ही जीभ त्यांचा जीवही वाचवते आणि त्यांना अन्नही देते. कर्ट म्हणतात की, हे तर स्पष्ट झालं आहे की सापांची जीभ ही टेस्टसाठी नाही तर गंध घेण्यासाठी असते.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सsnakeसापJara hatkeजरा हटके