वाहनाचे टायर काळे, टॉयलेट पेपर पांढरे आणि स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते? जाणून घ्या, असं आहे त्यामागचं विज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 16:46 IST
1 / 5लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपण अनेक गोष्टी बदलताना पाहिल्या आहेत. मात्र काही गोष्टींचे रंग मात्र एकच असल्याचे आपल्या दृष्टीस पडते. त्यामध्ये सायकलपासून ट्रकचे टायर नेहमीच काळे असतात. बहुतांश स्कूलबसचा रंग हा पिवळा असतो. तसेच टॉयलेट पेपर हे नेहमी पांढरे असतात. या वस्तूंचे असे रंग ठेवण्यामागे नेमके कारण काय आहे. यामागे काही विज्ञान आहे, 2 / 5स्कूल बस - स्कूल बसचा रंग पिवळा-काला असतो. यामागचं कारण सुरक्षेशी निगडित आहे. अंधारामध्येही पिवळा रंग लांबून दिसतो. तर हिवाळ्यामध्ये जेव्हा वातावरणात धुके दाटलेले असते. तेव्हाही हा रंग आरामात दिसतो. 3 / 5टॉयलेट पेपर - टॉयलेट पेपरचा विचार केल्यास ब्लीचमुळे याचा रंग पांढरा असतो. तसा नसल्याच तो भुरकट रंगाचा असतो. मात्र काही कंपन्या रंगीत टॉयलेट पेपरसुद्धा विकताता. मात्र पांढऱ्याच्या तुलनेत हा टॉयलेट पेपरर महाग असतो. रंगहीन म्हणजेच पांढरा असल्याने हा टॉयलेट पेपर सहजपणे विघटित होतो. 4 / 5टायर - वाहनांचे टायरचा विचार केल्यास टायरचा रंग हा सर्वसाधारणपणे काळा असतो. याचं कारण खूप रोचक आहे. टायर हे रबरापासून तयार केले जातात. तसेच त्यांचा रंग पांढरा ठेवला जाऊ शकतो. मात्र टायर हे मजबूत आणि टिकावू असणे आवश्यक असते. कारण टायरवरच वाहनाचे संपूर्ण वजन असते. असा परिस्थितीत टायर टिकावू बनवण्यासाठी रबरामध्ये कार्बन ब्लॅक मिसळले जाते. त्यामुळेच टायरचा रंग काळा होतो. 5 / 5सोशल मीडिया प्लॅटफॉर्म - फेसबूक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा रंग निळा असतो. मात्र इन्स्टाग्रामचा रंग लाल-पिवळा-ब्ल्यू मिक्स तर कू अॅपचा रंग पिवळा आहे. मात्र बहुतांश सोशल मीडिया अॅप हे निळ्या रंगाचे आहेत. निळा रंग हा मन आणि बुद्धीशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. संरक्षण आणि विश्वासाचे प्रतीक मानला जाणारा निळा रंग कम्युनिकेशनच्या प्रकियेशी संबंधित आहे.