By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:02 IST
1 / 6Airplane Doors Closed by Hands : विमानांमधील टेक्नॉलॉजी आजकाल किती सुधारली आहे हे आपण नेहमीच ऐकत किंवा बघत असतो. वेगवेगळ्या ऑटोमॅटिक सिस्टीम विमानांमध्ये लावलेल्या असतात. पण आपण एक गोष्टी पाहिली असेल की, विमानं इतकी हायटेक होऊनही विमानाचं दार एअर होस्टेस स्वत: आपल्या हाताने बंद करते. आपल्याला कधीना कधी प्रश्न पडला असेलच की, कितीतरी कोटी रूपयांच्या हायटेक विमानाचं दार ऑटोमॅटिक बंद न होता एअर होस्टेस का बंद करते? तेच आज आपण समजून घेणार आहोत. 2 / 6सगळ्यात आधी तर हे समजून घेतलं पाहिजे की, विमानाचं दार हे काही इतर वाहनांमधील सामान्य दारांसारखं नसतं. हे दार भरपूर फार मजबूत आणि जड असतं. मुळात विमानाची बॉडी ही अॅडव्हांस मटेरिअलने बनलेली असते. जेणेकरून हवेत उडताना दबाव पेलू शकेल. उड्डाण घेताना दरवाजा पूर्णपणे व्यवस्थित सील व्हायला हवा, नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. 3 / 6आपण पाहिलं की, टेकऑफ आणि लँडिंगवेळी एअर होस्टेस स्वत: हाताने दार चेक करते. हे दार ऑटोमॅटिक नसतं कारण सुरक्षा सगळ्याआधी पाहिली जाते. विमानात प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी केवळ एकच दार असतं. 4 / 6जर ऑटोमॅटिक दार असेल आणि त्यात काही बिघाड झाला किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम फेस झाली तर काय होईल? अशात दरवाजा जाम होऊ शकतो. तो उघडणारच नाही. प्रवासी आतच अडकतील. जर आग लागली किंवा इमरजन्सीची स्थिती असेल आणि दरवाजा उघडलाच नाही तर? मॅन्युअल पद्धतीने दार क्रू च्या कंट्रोलमध्ये राहतं, हाताने दार उघडून किंवा बंद करून चेक करता येतं की, सगळं सेफ आहे.5 / 6आणखी एक बाब म्हणजे विमान बनवणाऱ्या कंपन्या पैसाही वाचवतात. ऑटोमॅटिक सिस्टीम लावण्यासाठी पूर्ण सेटअप हवा असतो, मोटर्स, सेन्सर्स, वायरिंग यामुळे खर्च वाढतो. पण मुख्य कारण सुरक्षा हेच आहे. उड्डाणावेळी कॅबिनमध्ये प्रेशर तयार होतं, दार बाहेरच्या दबावामुळे चिकटतं, ते स्वत:हून उघडत नाही.6 / 6लँडिंगनंतर हवेचा दाब नॉर्मल झाल्यावर दार हाताने लोटून उघडता येतं. यासाठी एअर होस्टेसला ट्रेनिंग मिळतं. त्या जोर लावून हँडल फिरवतात आणि लॉक अनलॉक करतात. हे सगळं विचार करून डिझाइन केलं जातं. विमानातील इंजिनिअरींवर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर अनेक वर्ष रिसर्च केला जातो.