शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'पार्ले-जी' मध्ये 'जी' चा अर्थ काय आणि पाकिटावर दिसणारे मूल कोण आहे? जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 2:48 PM

1 / 10
भारतात पार्जे-जी बिस्कीट खाल्ले नाही, असा कोणीच सापडणार नाही. तुम्हीही कधी ना कधी पार्ले-जी खाल्लेच असतील. पण, या बिस्कीटाचे नाव 'पार्जे-जी' का आहे, असा विचार कधी केला का?
2 / 10
बहुतेक लोक उत्तर देतील की, कंपनीचा पहिला कारखाना मुंबईतील विलेपार्ले येथे सुरू झाला होता, म्हणून त्याच्या नावात 'पार्ले' हा शब्द आहे. पण 'पार्ले-जी' मधील 'जी' चा अर्थ काय आणि पॅकेटवर दिसणारे मूल कोण आहे, हा मोठा प्रश्न आहे. त्याची कहाणी जाणून घ्या...
3 / 10
Parlage-Glucose पासून बनले पार्लेजी- पार्ले प्रॉडक्ट्सची स्थापना 1929 मध्ये झाली. तेव्हा कंपनीत फक्त 12 लोक काम करायचे. 1938 मध्ये पहिल्यांदा बिस्किट तयार करण्यात आले. बिस्किटाचे नाव होते, पार्लेज-ग्लुको. 80 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत त्याचे नाव तेच होते.
4 / 10
पण, 1981 मध्ये कंपनीने Parlage-Gluco बदलून फक्त 'G' केले. हा 'जी' म्हणजे ग्लुकोज आहे. 80 च्या दशकात हे बिस्किट लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकप्रिय झाले. मुलांना आवडल्याने कंपनीने हा 'जी' शब्द बदलून जीनियस केला. मात्र, पाकिटावर पार्ले-जी असेच राहिले.
5 / 10
पॅकेटवर दिसणारे मूल कोण आहे?- पार्ले-जीच्या पॅकेटवर एक मूल दिसत. बिस्किट लाँच होऊन अनेक दशके उलटली तरी पॅकिंगवर दिसणारे मूल कोण यावर अनेक प्रकारचे दावे केले जातात. परंतु तीन नावे सर्वात सामान्य राहिली.
6 / 10
यामध्ये नीरू देशपांडे, सुधा मूर्ती आणि गुंजन गुंडानिया यांचा समावेश आहे. बिस्किटांच्या पाकिटावर या तिघांपैकी एकाचा बालपणीचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. यातील सर्वात मोठा दावा नीरू देशपांडे यांच्या नावाबाबत करण्यात येतो.
7 / 10
अनेक वृत्तपत्रांमध्ये नीरू देशपांडे यांच्या फोटोसह बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे छायाचित्र नागपूरच्या 65 वर्षीय नीरूच्या बालपणातील आहे.
8 / 10
नीरूचे हे छायाचित्र 4 वर्षांची असताना काढण्यात आल्याचे या बातमीत म्हटले. त्यांचे वडील प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हते, पण त्यांनी काढलेला फोटो इतका चांगला क्लिक झाला की पार्ले-जी च्या पॅकिंगसाठी निवडला गेला.
9 / 10
ही बातमी व्हायरल झाल्यावर पार्ले प्रॉडक्ट्सकडून उत्तर आले. कंपनीच्या उत्तराने या अफवांना पूर्णविराम मिळाला. पार्ले प्रॉडक्ट्स ग्रुपचे प्रॉडक्ट मॅनेजर मयंक शाह यांनी सर्व दावे फेटाळले आणि पॅकेटवर दिसणारे मूल हे एक इल्युस्ट्रेशन(काल्पनिक) असल्याचे सांगितले.
10 / 10
मूळात पार्लेजीवरचे मुले अस्तित्वातच नाही. एव्हरेस्ट क्रिएटिव्ह एजन्सीने हे चित्रण तयार केले आहे.अशाप्रकारे पॅकिंगबाबतच्या सर्व प्रकारच्या दाव्यांना पूर्णविराम मिळाला आणि त्याची खरी कहाणी बाहेर आली.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सParle Gपार्ले-जी