शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सेम टू सेम! 'या' गावात जन्माला येतात जुळी मुलं, शास्त्रज्ञ ही झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:36 PM

1 / 7
जुळी मुलं आपण नेहमीच पाहतो. पण भारतात असं एक गाव आहे जिथे जुळी मुलंच जन्माला येतात. यामागील रहस्य कोणालाच माहीत नाही. शास्त्रज्ञ ही यामुळे चकीत झाले आहेत. (फोटो - www.thenewsminute.com)
2 / 7
केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावात जुळी मुलं जन्माला येतात. (फोटो - www.thenewsminute.com)
3 / 7
कोडिन्ही गावाला 'व्हिलेज ऑफ ट्विंस' आणि 'ट्वीन टाउन' असं म्हटलं जातं.
4 / 7
जगभरात 1000 मुलांमध्ये 4 जुळी मुलं जन्माला येतात. मात्र या गावात 1000 मुलांमध्ये 45 जुळी मुलं जन्माला येतात. (फोटो - www.thenewsminute.com)
5 / 7
जुळ्या लोकांबद्दल असलेल्या रेकॉर्डचा विचार केल्यास केरळमधील हे गाव जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आशियामध्ये पहिला क्रमांक लागतो.
6 / 7
मलप्पूरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावाची लोकसंख्या ही जवळपास 2000 आहे. या गावात घर, शाळा, बाजार, रुग्णालयात सर्व जुळी मंडळीच दिसतात.
7 / 7
जुळी मुलं जन्माला येण्यामागे अनुवंशिक कारण असल्याचं म्हटलं जातं.
टॅग्स :Keralaकेरळ