शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:41 IST

1 / 12
Indian Railway Loco Pilot Salary: भारतीय रेल्वेची यंत्रणा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. हजारो ट्रेन दररोज सेवा देत असतात. या ट्रेनचे नियोजन हाच एक मोठा टास्क मानला जातो. लाखो लोक दररोज भारतीय रेल्वेच्या विविध सेवांचा लाभ घेत असतात. अगदी मुंबईतील लोकल ट्रेनपासून ते भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या वंदे भारत ट्रेनपर्यंत प्रवासी प्रवास करत असतात.
2 / 12
Vande Bharat Express Train Loco Pilot Salary: वंदे भारत, राजधानी, शताब्दी, डबल डेकर, दुरंतो, हमसफर, जनशताब्दी, अंत्योदय अशा प्रिमियम ते सामान्य प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे सेवा देते. जगभरात भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल नेटवर्क मानले जाते. परंतु, या ट्रेन वेळेत हाकण्याचे अतिशय कौशल्याचे, जबाबदारीचे आणि नित्य नेमाचे काम लोको पायलट करत असतात.
3 / 12
Rajdhani Express Train Loco Pilot Salary: एवढ्या अवाढव्य यंत्रणेतील सगळ्या सेवांचे सारथ्य करणे सोपी गोष्ट नाही. ट्रेन चालवण्यासाठी एक वेगळे कसब आत्मसाद करणे गरजेचे असते. ट्रेनमधील यंत्रणा, तंत्रज्ञान, सिग्नल यंत्रणा, रुळ यांबाबत अचूक माहिती असावी लागते, असे म्हटले जाते.
4 / 12
Shatabdi Express Train Loco Pilot Salary: लोको पायलट कसे बनता येते आणि ते किती कमाई करतात, हे जाणून घेण्याआधी लोको पायलटची निवड कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. थेट लोको पायलट बनू शकत नाही. रेल्वेमध्ये, उमेदवारांना प्रथम असिस्टंट लोको पायलट म्हणून नियुक्त केले जाते. यासाठी किमान ITI किंवा डिप्लोमा पात्रतेसह दहावीची पदवी आवश्यक आहे. यासह संबंधित क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्यांनाही प्राधान्य दिले जाते.
5 / 12
लोको पायलट होण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे आहे, नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट आहे. असिस्टंट लोको पायलट झाल्यानंतर, उमेदवारांना कठोर प्रशिक्षण दिले जाते. वेळोवेळी प्रत्यक्ष ट्रेनमध्ये व्यावहारिक अनुभव दिला जातो. अनेक वर्षांच्या सेवा आणि प्रशिक्षणानंतरच उमेदवार लोको पायलटची कर्तव्ये स्वीकारतात.
6 / 12
राजधानी, शताब्दी आणि आता वंदे भारत ट्रेन यांसारख्या हाय-स्पीड ट्रेनच्या लोको पायलटचे पगार किती आहेत असा प्रश्न अनेकदा लोकांना पडतो? असाही प्रश्न पडत असेल की कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वात जास्त पगार मिळतो.
7 / 12
भारतीय रेल्वेवरील लोको पायलटचा पगार ट्रेनचे मार्ग, ट्रेनचा प्रकार, अनुभव, ग्रेड आणि ओव्हरटाइमवर अवलंबून असतो. राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत या सर्व ट्रेन प्रीमियम श्रेणीत येतात.
8 / 12
या प्रिमियम ट्रेनच्या लोको पायलटना नियमित मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमधील लोको पायलटपेक्षा जास्त अनुभव असतो, त्यामुळे त्यांचे पगार जास्त असतात.
9 / 12
वंदे भारत, राजधानी, शताब्दी या तीन ट्रेनच्या सेवांपैकी वंदे भारत ट्रेनचे लोको पायलट सामान्यतः सर्वाधिक पगार मिळवतात. याचे कारण ती एक हाय-स्पीड ट्रेन, प्रिमियम ट्रेन आहे. अशा ट्रेन चालवण्यासाठी अधिक प्रशिक्षण, अधिक अनुभव आणि तांत्रिक कौशल्ये आवश्यक असतात. त्यानंतर राजधानी आणि शताब्दी ट्रेनचे लोको पायलट येतात.
10 / 12
पगाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर असिस्टंट लोको पायलटचा सुरुवातीचा मूळ पगार ₹१९,९०० (लेव्हल-२) आहे, जो भत्त्यांसह अंदाजे ₹३०,०००-३५,००० इतका होतो. वाढत्या अनुभवासोबत पदे आणि पगार वाढत जातात.
11 / 12
एक वरिष्ठ लोको पायलट ₹३५,००० ते ₹५५,००० पर्यंत कमवू शकतो. मुख्य लोको पायलट ₹६०,००० किंवा त्याहून अधिक कमवू शकतात. परंतु प्रीमियम ट्रेनचे चालक बरेच जास्त कमावतात, असे सांगितले जाते.
12 / 12
भारतीय रेल्वेत हजारो लोको पायलट, गार्ड, ट्रेन मॅनेजर दररोज आपली सेवा देत असतात. प्रवाशांना वेळेत गंतव्य स्थानी नेण्यासाठी लोको पायलट महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, असे सांगितले जाते.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpilotवैमानिकTravel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटकेEducationशिक्षण