शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बाबो! भिकाऱ्याच्या खोलीत सापडल्या नोटांनी भरलेल्या दोन पेट्या, रक्कम पाहून सगळेच झाले हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 10:28 IST

1 / 10
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशच्या तिरूमाला डोंगरावर असलेलं तिरूपती बालाजी मंदिर जगप्रसिद्ध आहे. हे जगातलं सर्वात श्रीमंत देवस्थान मानलं जातं. तसे तर सर्वच धार्मिक स्थळावर देवाच्या नावाने भीक मागणाऱ्यांची गर्दी असते. पण कधी कधी त्यांच्याबाबत असं काही ऐकायलं मिळतं की, थक्क व्हायला होतं.
2 / 10
तिरूपती बालाजी मंदिरातून एक अशीच हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे VIP भाविकांना टिळा लावून त्यांच्याकडून पैसे मागणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात लाखो रूपयांची रोकड सापडली आहे. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण...
3 / 10
या व्यक्तीच्या रूमवर काही लोकांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर प्रशासनाने घाईघाईने कारवाई केली. ६४ वर्षीय श्रीनिवासन तिरूमाला येथे येणाऱ्या व्हीआयपी भाविकांना भीक मागत होते. ते व्हीआयपी भाविकांना तोपर्यंत सोडत नव्हते जोपर्यंत ते त्यांच्याकडून टिळा लावून पैसे घेत नाही.
4 / 10
आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरात जो खजिना सापडला तो पाहून सगळेच हैराण झाले. त्यांच्या घरात दोन पेट्यांमध्ये लाखो रूपये सापडले.
5 / 10
गेल्या एक वर्षापासून पाहिलं जात होतं की, अनधिकृत लोक शेषाचल नगरमधील त्यांच्या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अंदाज होता की, या व्यक्तीच्या घरात लाखो रूपये असतील.
6 / 10
असे सांगितले जाते की, त्यांचा स्वभाव फार चांगला होता. विन्रम असल्याने त्यांना लोक पसंत करायचे. अनेकदा भाविक त्यांच्याकडूनच टिळा लावून घेत होते.
7 / 10
श्रीनिवासन यांचा कोणताही परिवार नसल्याने त्यांची ही संपत्ती सरकारी खजिन्यात जमा होणार आहे. आपल्या तारूण्यात बालाजीला आलेले श्रीनिवासन हे तिरूपती बालाजीचे भक्त होते.
8 / 10
काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोन मंदिरात आले होते तेव्हा श्रीनिवासन त्यांच्या मागे होते. त्यांच्याकडून पैसे घेतल्यावरच ते मागे हटले.
9 / 10
श्रीनिवासन यांचा कोणताही परिवार नसल्याने त्यांची ही संपत्ती सरकारी खजिन्यात जमा होणार आहे. आपल्या तारूण्यात बालाजीला आलेले श्रीनिवासन हे तिरूपती बालाजीचे भक्त होते.
10 / 10
असे सांगितले जाते की, त्यांचा स्वभाव फार चांगला होता. विन्रम असल्याने त्यांना लोक पसंत करायचे. अनेकदा भाविक त्यांच्याकडूनच टिळा लावून घेत होते.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशJara hatkeजरा हटके