शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

वाह रे चोर! आधी कूलर चोरी केला अन् सकाळी पुन्हा आणून ठेवला, घटना CCTV मध्ये कैद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 12:05 IST

1 / 7
दुकानदाराने सांगितले की, चोरांनी कूलर चोरी केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पीडित व्यक्तीने याची माहिती पोलिसांना दिली.
2 / 7
इथे एका अज्ञात व्यक्तीने 5 जूनच्या रात्री उशीरा शहरातील मार्केटमधून एक कूलर चोरी केला होता. हा कूलर त्यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून पळवला होता. पण 6 जूनच्या सकाळीच चोराने तो कूलर पुन्हा दुकानासमोर आणून ठेवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
3 / 7
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कूलरची चोरी आणि पुन्हा तो परत आणून ठेवण्याची ही घटना सध्या या भागात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकजण चोराचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करून चोराचा शोध सुरू केलाय.
4 / 7
झालं असं की, शहरातील अनिल मंगल यांचं भारद्वाज मार्केटमध्ये मेडिकलचं दुकान आहे. इथूनच चोराने रात्री उशीरा कूलर चोरी केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कूलर पुन्हा आणून ठेवला होता.
5 / 7
तर दुसरीकडे पोलीस उप-निरीक्षक श्यामसुंदर यांनी सांगितले की, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. आता अज्ञात चोरांचा शोध सुरू आहे. चोरांची ओळख पटू शकली नाही. तर चोरांचं हे अजब वागणं गावात चर्चेचा विषय बनलं आहे.
6 / 7
दुकानदाराने सांगितले की, चोरांनी कूलर चोरी केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पीडित व्यक्तीने याची माहिती पोलिसांना दिली.
7 / 7
तर दुसरीकडे पोलीस उप-निरीक्षक श्यामसुंदर यांनी सांगितले की, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. आता अज्ञात चोरांचा शोध सुरू आहे. चोरांची ओळख पटू शकली नाही. तर चोरांचं हे अजब वागणं गावात चर्चेचा विषय बनलं आहे.
टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटके