जगातील 'या' देशांकडे आजही नाही स्वत:चं सैन्य, वाचा कुणी हल्ला केलाच तर काय करतात ते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 12:27 IST
1 / 8Countries without any armed forces: कोणत्याही देशासाठी सैन्य दल किती महत्वाचा असतो हे अनेकदा स्पष्ट झालं आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सैनिक असणं खूप गरजेचं असतं. पण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आजही काही देश असे आहेत ज्यांच्याकडे त्यांचं सैन्य दल नाही. 2 / 8देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी सैन्य दल असणं फार गरजेचं असतं. सामान्यपणे सगळ्याच देशांककडे एक स्थायी सैन्य दल असायला हवं. पण काही देशांकडे ते आजही नाही. हे देश मानतात की, 'युद्ध नर्क आहे'. त्यामुळे त्यांच्याकडे सैन्य दल नाही. पाहुयात कोणते आहेत हे देश...3 / 8१९४८ मध्ये गृहयुद्धात विजय मिळवल्यानंतर या देशानं कोणत्या सशस्त्र दलाचा वापर करणं बंद केलं. दरवर्षी कोस्टा रिकामध्ये १ डिसेंबरला सेना उन्मूलन दिवस साजरा केला जातो. सध्या येथील पोलिसच देशाची अंतर्गत सुरक्षा सांभाळते.4 / 8१९८३ मध्ये अमेरिकेने या देशावर हल्ला केला होता आणि तेव्हा ग्रेनेडाकडे कोणतीही सेना नव्हती. रॉयल ग्रेनेडा पोलीस दलाच्या अंतर्गत एक अर्धसैनिक दल अंतर्गत सुरक्षेसाठी काम करतं.5 / 8तीन बेटाचा समूह असलेला किरिबाती सुद्धा एक असा देश आहे, ज्याच्याकडे सैन्य दल नाही. या देशाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलॅंडकडून सुरक्षा मिळते आणि देशात पोलीस सेवाही आहे.6 / 8एका सैन्य करारानंतर अंडोराला स्पेन आणि फ्रान्सकडून सुरक्षा मिळते. पण त्यांचेकडे स्वत:चं सैन्य नाही. अंडोराकडे विशेष समारोहासाठी एक छोटी सेना आहे. 7 / 8जगातील हा सगळ्यात छोटा देश आहे. इथे पोप आणि देशाच्या सुरक्षेसाठी अनेक सशस्त्र दल असायचे, पण पोप पॉल VI यानी १९७० मध्ये सगळे दल बर्खास्त केले. हा छोटा देश रोममध्ये आहे, त्यामुळे इटलीकडून याला सुरक्षा मिळते.8 / 8आइसलॅंडजवळ १८६९ मध्ये एक सेना होती. पण त्यानंतर देशानं अमेरिकेसोबत करार केला. त्यामुळे आइसलॅंड सुरक्षा बलाला कायम ठेवण्यात आलं आहे. २००६ मध्ये अमेरिकेने घोषणा केली की, ते आइसलॅंडला विना कोणत्याही सैन्य दलाशिवाय सुरक्षा देतील.