शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूरतमध्ये आकाशातून झाला सोन्याचा वर्षाव, गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 9:34 PM

1 / 5
गुजरातमधील सूरतजवळ असलेल्या एका गावात आकाशातून सोन्याचा वर्षात झाल्याचीचर्चा सध्या जोरात सुरू आहे. सोन्याचा वर्षाव झाल्याची वार्ता कळताच लोकांनी सोने गोळा करण्यासाठी रस्त्यांवर धाव घेतली. सूरत विमानतळाजवळ असेल्या डुम्मस गावातील लोकांना अशा वस्तू मिळत आहेत ज्या दिसण्यास हुबेहूब सोन्यासारख्या आहेत.
2 / 5
या संदर्भातील वृत्त आज तकने प्रसारित केले आहे. सोन्यासारखी दिसणारी ही वस्तू रस्ता तसेच आजूबाजूच्या झुडपांमधून सापडत आहे. मात्र ही वस्तू नेमकी आली कुठून हे कुणालाही माहित नाही आहे. दरम्यान, येथे येणारा प्रत्येक जण सोनं समजून ही वस्तू आपल्यासोबत नेत आहे.
3 / 5
दरम्यान, सोने सापडल्याची गोष्ट गावांमध्ये आगीसारखी पसरली असून, आजूबाजूच्या गावातील लोक सोने गोळा करण्यासाठी डुम्मस गावात धाव घेत आहेत. इतकेच काय तर लोक रात्रीच्या अंधारातसुद्धा टॉर्च घेऊन सोने शोधत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी पायी जात असताना काही लोकांना सोन्यासारखी चमकणारी ही वस्तू दिसून आली. तेव्हापासून या सोन्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
4 / 5
या लोकांनी इतर गाववाल्यांना याची माहिती दिली. तेव्हापासून या ठिकाणी सोने गोळा करण्यासाठी धाव घेत आहे. चकाकणारी ही वस्तू सोने आहे की पितळ हे ठावूक नसल्याचे काही जणांनी सांगितले. तर काही जण या वस्तूला सोनं समजून घरी नेत आहेत.
5 / 5
दरम्यान, येथे सोन्याच्या शोधात आलेल्या मोहन यांनी सांगितले की येथे काल रात्री काही लोकांना सोने मिळाले होते. त्यानंतर ही गोष्ट हळुहळू सर्वांना समजली. मीसुद्धा सोने शोधण्यासाठी आलो आहे. मात्र मला अजूनही काही मिळालेले नाही. मात्र सापडत असलेली वस्तू सोने आहे की पितळ हे समजू शकलेले नाही. तरीही ही वस्तू गोळा करण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.  
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGujaratगुजरात