शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

काहीही न खाता साप किती दिवस जिवंत राहू शकतात? कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:35 IST

1 / 8
साप वेगवेगळ्या प्रजातींचे असतात. त्यांचं राहणीमान, खाणं-पिणं, स्वभाव वेगवेगळे असतात. बऱ्याच लोकांना सापांबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपणही त्यांपैकी असाल तर आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, साप काहीही न खाता किती दिवस जिवंत राहू शकतात? याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत.
2 / 8
भरपूर लोक सापाला एक भयानक जीव मानतात, तर काही लोक सापांकडे एखाद्या रहस्यमयी जीवासारखे बघतात. पण जगात भलेही सापांच्या हजारो प्रजाती असतील, पण जास्तीत जास्त प्रजाती या बिनविषारी असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं. अशात आज आपण पाहणार आहोत की, साप काही न खाताही किती दिवस जिवंत राहू शकतात.
3 / 8
सामान्यपणे जगभरात सापांच्या ३ हजार ते ३,९०० प्रजाती आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, सापांच्या जगात ३७८९ प्रजातती आहेत. प्रत्येक प्रजातीची जीवनशैली वेगळी असते. काहींचा जगण्याचा कालावधी सुद्धा वेगवेगळा असतो.
4 / 8
मीडिया रिपोर्टनुसार, साप अतिशय कमी अन्नावरही दीर्घकाळ जिवंत राहू शकतात, कारण त्यांचा मेटाबॉलिझम खूप संथ असतो. साप किती दिवस काहीही न खाता राहू शकतो, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. साप २ ते ६ महिने सहज काहीही न खाता जिवंत राहू शकतात. मोठे साप ६ महिने ते १ वर्ष पर्यंत अन्नाशिवाय राहू शकतात. योग्य तापमान आणि शांत परिस्थितीत १.५ ते २ वर्षे सुद्धा न खाता साप जिवंत राहिल्याची नोंद आहे.
5 / 8
वेगवेगळ्या सापांचं आयुष्य देखील वेगवेगळं असतं. जर कोब्राबाबत सांगायचं तर ते २५ ते ३० वर्षापर्यंत जगतात. त्याशिवाय इंडियन करैतबाबत सांगायचं ते १० ते १५ वर्ष जगतात.
6 / 8
एका माहितीनुसार, जर सापांना जास्त काळ अन्न मिळालं नाही तरी सुद्धा त्यांची लांबी वाढत राहते. पण त्यांचं वजन कमी होतं. कारण सापाचं शरीर हळूहळू वाढतं, मग ते अन्न मिळो अथवा न मिळो.
7 / 8
असं अजिबात नाहीये की, साप केवळ अन्नावर जिवंत राहतात. त्यांना जिवंत राहण्यासाठी अन्नाशिवायही इतरही काही गोष्टी आहेत. जसे की, वातावरण, ओलावा, लपण्याची जागा. जर या गोष्टी योग्य असतील तर साप काही न खाताही जास्त काळ जगू शकतात.
8 / 8
अजगराबाबत सांगायचं तर ते अनेक महिने काहीही न खाता जिवंत राहू शकतात. जगातील सगळेच मांसाहारी असतात. सापांचं आवडतं खाद्य बेडूक, उंदीर, पाली, पक्षी, कीटक असतात. किंग कोब्राबाबत सांगायचं तर ते इतर सापांनाच आपलं खाद्य बनवतात. अॅनाकोंडा आणि अजगर ससे, माकड, लांडगे, हरीण, गाय, बकरी अशा प्राण्यांची शिकार करतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सsnakeसापJara hatkeजरा हटके