शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ichthyosaurs: ब्रिटनच्या संशोधकांना सापडला 9 कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या 'इचथियोसॉर'चा सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 12:36 PM

1 / 11
पृथ्वीवर कोही कोटी वर्षांपूर्वी अनेक अजस्त्र प्राण्यांचे वास्तव्य होते. पण, उल्कापिंडामुळे झालेला विद्धवंस आणि इतर कारणांमुळे अनेक प्राणी नामशेष झाले. पण, या प्राण्यांचे सांगाडे आजही आपल्याला पृथ्वीवर आढळलात.
2 / 11
ब्रिटनमधील शास्त्रज्ञांना मिडलँड परिसरात अशाच प्रकारचा एक अजस्त्र सांगाडा सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांना 18 कोटी वर्षे जुना महाकाय 'समुद्री पाण्या'चा (इचथिओसॉर) सांगाडा सापडला आहे.
3 / 11
डॉल्फिनसारखा दिसणारा हा सागरी ड्रॅगन 30 फूट लांब आहे. तसेच, फक्त त्याच्या कवटीचे वजन फक्त 1 टन आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा आणि संपूर्ण जीवाश्म आहे.
4 / 11
इचथियोसॉर प्रथम 19व्या शतकात जीवाश्मशास्त्रज्ञ मेरी अॅनिंग यांनी शोधला होता. आता सापडलेला सांगाडा जो डेव्हिस यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये शोधला आहे.
5 / 11
मिडलँड परिसरातील रुटलँडच्या पाण्याजवळ सापडलेला हा सागरी ड्रॅगन 82 फुट लांब आहे. मोठे दात आणि डोळ्यांमुळे इचथियोसॉरला समुद्रातील ड्रॅगन म्हटले जाते.
6 / 11
या सागरी प्राण्याचा अभ्यास करणारे डॉ. डीन लोमॅक्स म्हणाले, 'ब्रिटनमध्ये इचथियोसॉरचे अनेक जीवाश्म सापडले आहेत, पण हा सांगाडा ब्रिटनमध्ये सापडलेला सर्वात मोठा सांगाडा आहे.
7 / 11
दिसायला आजच्या डॉल्फिनसारखा असणारा इचथियोसॉर प्राणी जगात प्रथमतः 25 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला आणि 9 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झाले.
8 / 11
इचथिओसॉरचे वास्तव्य इंग्लंड आणि अटलांटिक समुद्राच्या पाण्यात होते. इचथियोसॉरचे डोळे आणि दात त्याच्या शरीराच्या तुलनेत मोठे असायचे.
9 / 11
संशोधनात असे दिसून आले की, माशांच्या आकाराच्या इचथिओसॉरचा आकार सुमारे 24 कोटी वर्षांपूर्वी खूप वेगाने वाढला होता. या प्राण्याच्या फक्त डोक्याचा आकार 6.5 फूट इतका होता.
10 / 11
कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स कॉलेजमधील जीवशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आणि वरिष्ठ जलचर संशोधक लार्स श्मिट्झ यांनी अभ्यासात सांगितले की, इचथियोसॉर व्हेल माशाच्या तुलनेत खूप वेगाने वाढले होते.
11 / 11
डायनासोरसारखे प्राणी पृथ्वीवरुन वेगाने नामशेष होत होते, तेव्हा हा प्राणी पृथ्वीवर जगण्यासाठी धडपड करत होता. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे, यामुळे अनेक रहस्ये उघड होतील, असे ते म्हणाले.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय