शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सोन्यापेक्षाही महाग विकलं जातं हे मध, सामन्य मधापेक्षा असतं फार वेगळं, अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:45 IST

1 / 6
दैनंदिन उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या बाजारात सहज उपलब्ध असलेल्या मधाबाबत आपल्या सर्वांना माहिती असेलच. साधारण सोनेरी तपकिरी रंगाचं मध आवडत नाही, असी माणसं क्वचितच असतील. मात्र तुम्ही कधी ग्रीन हनी किंवा हिरव्या मधाबाबत ऐकलंय का?
2 / 6
हिरव्या रंगाचं हे मध खूप दुर्मीळ असतं. तसेच ते सामान्य मधाप्रमाणे सहजपणे उपलब्ध होत नाही. याचं कारणं म्हणजे हे मध गोळा करणाऱ्या मधमाशांची संख्या खूप कमी आहे. हे हिरवं मध मधमाशा जेव्हा हिरव्या रंगाचा मकरंद गोळा करतात तेव्हा तयार होतं.
3 / 6
हे हिरवं मध कही खास फुलांमधील मकरंदापासून तयार होतं. हे मध नेपाळमधील हिमालयाच्या परिसरातील रोडोडेंड्रोन फुलांपासून तयार केला जातो. या मधाचा रंग जंगली फुले, खनिजे आणि पर्यावरणामुळे तयार होतो. तर मलेशिया आणि इटलीमध्ये स्पायरुलिना ग्रीन हनी तयार केलं जातं. मात्र खरं ग्रीन हनी खूप दुर्मीळ आहे. नेपाळमध्ये हिमालनीय मधमाशा ३५०० मीटर पेक्षा जास्त उंचीवर कड्यांवर पोळी बनवतात. गुरुंग समाजातील शिकारी लोक जीवावर उदार होऊन अशा दुर्गम ठिकाणांहून मध गोळा करतात. अशा प्रकारचं १ किलो मध गोळा करण्यासाठी मधमाश्या ह्या आपलं संपूर्ण आयुष्य खपवतात.
4 / 6
या हिरव्या रंगाच्या नैसर्गिक मधाची किंमत प्रति १०० ग्रॅममागे १०० ते २०० डॉलर एवढी असते. दरम्यान, बाजारात रंग मिसळलेलं हिरवं मध मिळतं. ते स्वस्तही असतं. मात्र अशा मधाची तपासणी करूनच ते खरेदी करणं आवश्यक असतं.
5 / 6
हे हिरवं मध केवळ गोडच नसतं तर त्यामध्ये एक प्रकारची सौम्य नशादेखील असते. हे मध आरोग्याला खूप फायदेशीर असतं. या मधाचं सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. भारताच्या हिमालयीन जंगलांमध्ये जंगली मध मिळतं, मात्र हिरवं मध खूपच कमी मिळतं.
6 / 6
सध्या सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडत आहेत. मात्र या सोन्या चांदीपेक्षा महागडं असं एक मध मिळतं हे अनेकांना माहिती नसेल. हे मध खूप दुर्मीळ आहे, ते सहजपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्याची किंमत अधिक आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfoodअन्न