शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

37 वर्षांपासून ओसाड पडलेला थीम पार्क; आजही लोक यायला घाबरतात, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 7:34 PM

1 / 6
तुम्ही कधी ना कधी थीम पार्कमध्ये गेला असाल. थीम पार्कमध्ये रोलर कोस्टरसह विविध राईड्सचा रोमहर्षक अनुभव मिळतो. जगभरात असे अनेक थीम पार्क आहेत, ज्यात हजारो लोक मनोरंजनासाठी येतात. पण, युक्रेनमधील एक थीम पार्क गेल्या 37-38 वर्षांपासून ओसाड पडला आहे.
2 / 6
हा लोकांच्या मनोरंजनासाठीच बांधण्यात आला होता, पण एका घटनेमुळे हा थीम पार्क कधी सुरुच होऊ शकला नाही. आजही लोक इथे यायला घाबरतात. एखाद्या हॉरर चित्रपटाप्रमाणे दिसणारे हे थीम पार्क युक्रेनच्या उत्तरेकडील भागात आहे.
3 / 6
'प्रिपयत ॲम्युझमेंट पार्क' (Pripyat Amusement Park) असे याचे नाव आहे. या थीम पार्कमध्ये सर्व राईड्स/गेम्स आहेत, परंतु येथे कोणीही येत नाही. हे निर्जन थीम पार्क पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. या थीम पार्कबद्दलच्या कथाही खुप लोकप्रिय आहेत.
4 / 6
मीडिया रिपोर्टनुसार, या पार्कचे उद्घाटन सुमारे चार दशकांपूर्वी, म्हणजेच मे 1986 मध्ये होणार होते. परंतु चेर्नोबिलमधील प्राणघातक आण्विक आपत्तीमुळे हे थीम पार्क उद्घाटनापूर्वीच बंद करण्यात आले. आजही हे थीम पार्क पाहून त्या भयावह दिवसाच्या आठवणी जाग्या होतात.
5 / 6
आजही हे उद्यात तशाच अवस्थित पडून आहे, फक्त यातील राईड्स पूर्णपणे गंजून गेल्यात आणि या परिसरालाही पूर्णपणे झाडांनी व्यापून टाकले आहे. त्या आण्विक आपत्तीमुळे या उद्यानातील किरणोत्सर्गाची पातळीही खूप वाढली होती आणि आजही येथे किरणोत्सर्गाच्या संपर्कात येण्याचा धोका असल्याचे सांगण्यात येते.
6 / 6
त्यामुळेच हे उद्यान कधीच सुरू झाले नाही. काही साहसी लोक येथे फिरण्यासाठी येत असतात, परंतु जास्त वेळ थांबण्याची चूक करत नाहीत. येथील रेडिएशनची पातळी इतकी धोकादायक आहे की, यामुळे जीवही जाऊ शकतो.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय