या गावात कधीच पडत नाही पाऊस, कारण असं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:57 PM2023-02-28T12:57:16+5:302023-02-28T13:11:00+5:30

No Rain Village : आज आम्ही तुम्हाला अशाच गावाबाबत सांगणार आहोत. या गावात कधीच पाऊस न पडण्याचं कारणही इंटरेस्टिंग आहे.

No Rain Village : तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला का की, जगात असं एखादं गाव आहे का जिथे कधीच पाऊस पडत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच गावाबाबत सांगणार आहोत. या गावात कधीच पाऊस न पडण्याचं कारणही इंटरेस्टिंग आहे.

सामान्यपणे जर कुणाला प्रश्न विचारला गेला की, असं कोणतं ठिकाण आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही? तर बरेच लोक वाळवंट असं उत्तर देऊ शकतात. पण असं अजिबात नाहीये. जगात कधीच पाऊस न पडणारं गाव हे एका सुंदर डोंगरावर वसलं आहे. हे गाव यमनची राजधानी सनाच्या पश्चिमेला मनख भागातील 'अल-हुतैब' नावाचं गाव आहे.

अल-हुतैब हे गाव समुद्र सपाटीपासून 3,200 मीटर उंचीवर आहे. हा फार उष्ण परिसर मानला जातो. पण सकाळी इथे कडाक्याची थंडी पडते. इतकी की, तुम्ही सहजपणे बाहेर फिरू शकणार नाही. पण जसजसा सूर्य डोक्यावर येतो उष्णता इतकी वाढते की, जसा उन्हाळा असावा.

यमनच्या अल-हुतैब गाव चांगलं फेमस आहे. हे गाव एका सुंदर डोंगरावर सुंदररित्या वसवण्यात आलं आहे. शेकडो टुरिस्ट इथे नेहमीच फिरायला येतात. इथू खाली दिसणारा नजारा डोळे दिपवणारा असतो. आता मुख्य मुद्दा हा की, इथे कधीच पाऊस का पडत नाही?

हे सुंदर गाव उंच डोंगरावर वसलेलं असल्याने ढग नेहमी याच्या खाली असतात. त्यामुळे लोकांना स्वर्गाचा फील येतो. पण हीच सुंदरता या गावात पाऊस न होण्याचं कारण आहे. ढग या गावाच्या खाली तयार होतात आणि खालीच पाऊस पडतो. त्यामुळे गावात पावसाचा एक थेंबही पडत नाही.

अल-हुतैब गावात अनेक प्राचीन आणि आधुनिक वास्तुकला आहेत. या गावातील जास्तीत जास्त लोक अल-बोहरा किंवा अल-मुकरमा' समुदायातील आहेत. यांना यमनी समुदाय म्हटला जातो. हे मुहम्मद बुरहानुद्दीनचं नेतृत्व मुस्लिम समुदायाशी संबंधित आहेत. या समुदायाचे अनेक लोक मुंबईत राहतात.

यमनच्या अल-हुबैत गावाला बघण्यासाठी दरवर्षी हजारो टुरिस्ट इथे येतात. या गावातील घरांची बनावट त्यांना आवडते. गावाखाली ढगांमधून पडणारा पाऊस बघण्यासाठी खूप लोक इथे येतात.