शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...म्हणून लंडनमधील लोकांचा पॅन्ट न घालताच ट्रेन प्रवास; कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का; असा होता नजारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 6:09 PM

1 / 9
लंडनमध्ये रविवारी सबवे आणि ट्यूबमधील नजारा काही सा बदललेला दिसला. येथे मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषही पॅन्ट न घालताच ट्यूबमध्ये दिसून आले.
2 / 9
महत्वाचे म्हणजे, या लोकांनी इतर कपडे आणि बूट रोजच्या सारखेच घातले होते. मात्र, पॅन्ट अथवा ट्राउझर घातलेली नव्हती. खरे तर हे लोक नो ट्राउझर्स डे सेलिब्रेट करत होते.
3 / 9
हा 12वा वार्षिक नो ट्राउझर्स ट्यूब राईड इव्हेंट होता. स्टिफ अप्पर लिप सोसायटीने या इव्हेंट चे आयोजन केले होते. गेल्या 2002 मध्ये न्यूयॉर्कमधून या इव्हेंटची सुरुवात झाली. याला नो पँट्स सबवे, असे नाव देण्यात आले होते. यानंतर हा दिवस जगातील इतरही काही भागांमध्ये सेलिब्रेट केला जाऊ लागला.
4 / 9
या इव्हेंटचं काही विशेष कारण नाही - सर्वात महत्वाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या इव्हेंटमागे कुठलाही विशेष उद्देश नाही. हा इव्हेंट केवळ मनोरंजन म्हणून आयोजित केले जातो.
5 / 9
या इव्हेंटमध्ये ट्रेनने प्रवास करताना पॅन्ट घालायची नसते. एक वृत्तानुसार, या इव्हेंटमध्ये भाग घेणाऱ्यांना आपण ट्राउझर घरी विसरून आलो आहोत, असे जाहीर करावे लागते.
6 / 9
या इव्हेंटसंदर्भात सोशल मीडियावर लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रियाही येत आहेत. एका युजरने लिहिले आहे, मला आज बर्लिनचे दिवस आठवले, जेव्हा मी पहिल्यांदाच असे काही बघितले होते. कडाक्याच्या थंडीत केवळ अंडरविअर घालून लोक ट्रेनने प्रवास करत होते.
7 / 9
सोशल मीडियावर फोटो - यातच सोशल मीडियाही ‘नो ट्राउझर्स डे’च्या फोटोंनी भरलेला आहे. तसेच कमेंट करणारेही या फोटोंबवर जबरदस्त रिअॅक्शन्स देत आहेत.
8 / 9
एक यूझरने लिहिले, मला माहीत आहे की, कोरोना काळात लोकांनी हाफपॅन्ट आणि अंडरविअर घालूनच झूम कॉल्स अटेंड केले आहेत. मात्र, न्यू नॉर्मलमध्ये असेही काही होते, हे मला वाटले नव्हते.
9 / 9
आणखी एका यूझरने लिहिले, नो ट्राउझर्स डे सारखेही काही असते, हे मला आज समजले...
टॅग्स :Englandइंग्लंडLondonलंडनJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल