शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:30 IST

1 / 6
Mysterious Unakoti Temple: भारतात अनेक ठिकाणी रहस्यमय प्राचीन मंदिरे, पुराणकथा आणि विविध प्रकारच्या श्रद्ध-अंधश्रद्धा पाहायला मिळतात. अशाच गूढ आणि कुतूहल वाढवणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे त्रिपुरातील प्रसिद्ध उनाकोटी मंदिर. येथे तब्बल ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्ती असल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे, ही संख्या एक कोटीपेक्षा नेमकी एकाने कमी का आहे? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
2 / 6
उनाकोटी मंदिरातील शिल्पकलेबाबतचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इतक्या प्रचंड संख्येने मूर्ती कोणी, केव्हा आणि कशा तयार केल्या? इतिहासकार, संशोधक आणि पुरातत्त्वतज्ज्ञांनी या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आजपर्यंत कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा सापडलेला नाही. येथे देव-देवता, पशू-पक्षी आणि पौराणिक आकृत्यांची भव्य शिल्पे डोंगरकड्यांवर कोरलेली दिसतात. ९९,९९,९९९ ही ‘अपूर्ण’ संख्या या मंदिराच्या गूढतेत आणखी भर घालते आणि भाविकांसह अभ्यासकांनाही आकर्षित करते.
3 / 6
लोककथेनुसार, एकदा भगवान शिव एक कोटी देवी-देवतांसह प्रवासाला निघाले होते. प्रवासादरम्यान सर्व देवता थकून एका ठिकाणी झोपले. सकाळी शिव जागे झाल्यावर देवता अजूनही झोपलेले पाहून त्यांनी रागात येऊन त्यांना दगडात रूपांतरित होण्याचा शाप दिला. म्हणजेच, त्या दगडी मूर्ती म्हणजे देवतांचीच दगडी रूपे असल्याची श्रद्धा आहे. मान्यतेनुसार, एक देवता वाचल्यामुळे संख्या एक कोटीऐवजी एकाने कमी राहिली. ही कथा आजही भाविकांमध्ये सर्वाधिक प्रचलित आहे.
4 / 6
दुसरी एक लोकप्रिय कथा कालू नावाच्या कुशल शिल्पकाराशी संबंधित आहे. या कथेनुसार, कालू कारागीर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासोबत कैलास पर्वतावर जाण्याची इच्छा बाळगून होता. भगवान शिवाने त्याच्यासमोर अट ठेवली की, एका रात्रीत जर त्याने एक कोटी देवी-देवतांच्या मूर्ती तयार करू शकला, तर त्याला कैलासला नेले जाईल. कालूने रात्रभर अथक परिश्रम घेतले, मात्र सकाळ होईपर्यंत एक मूर्ती कमी पडली. अट पूर्ण न झाल्यामुळे शंकराने त्याला कैलासाला नेले नाही. याच घटनेतून या स्थळाला ‘उनाकोटी’ (एक कोटीपेक्षा एक कमी) हे नाव मिळाल्याचे मानले जाते.
5 / 6
उनाकोटी मंदिर हे त्रिपुराची राजधानी अगरतळा पासून सुमारे १४५ किलोमीटर अंतरावर आहे. नैसर्गिक डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. उनाकोटी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भारतीय लोककथा, श्रद्धा आणि शिल्पकलेचे जिवंत प्रतीक आहे.
6 / 6
उनाकोटी मंदिर हे त्रिपुराची राजधानी अगरतळा पासून सुमारे १४५ किलोमीटर अंतरावर आहे. नैसर्गिक डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. उनाकोटी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भारतीय लोककथा, श्रद्धा आणि शिल्पकलेचे जिवंत प्रतीक आहे.
टॅग्स :Tripuraत्रिपुराTempleमंदिरInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स