भारतातील 'रहस्य'मय मंदिर; मेलेला माणूस काही क्षणासाठी होतो जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:00 IST
1 / 7आपल्या देशात आणि जगात अनेक चमत्कारीक ठिकाणं आहेत, किंबहुना या ठिकाणांचा इतिहास चमत्कारीक आहे, असेच म्हणता येईल. भारतातही असे एक मंदिर आहे, ज्याची कथा ऐकून आश्चर्य वाटेल. 2 / 7 येथील मंदिरात मृत्यु झालेल्या व्यक्तीचा पुनर्जन्म होतो, असं सांगण्यात येते. ऐकायला थोडं चकित करणारं वाटलं तरी हे प्रमाण मानले जाते. या मंदिरात एखाद्या मृत शरिराला घेऊन गेल्यास ते जिवंत होते. 3 / 7उत्तराखंडच्या लाखामंडल येथील हे मंदिर आहे, गुहा आणि भगवान महादेव यांच्या पुरातन मंदिरांच्या अवशेषांनी ही जागा वेढलेली आहे. 4 / 7येथे खोदकाम करताना पुरातन विभागाला विभिन्न आकाराच्या आणि विभिन्न प्रकारच्या शिवलिंगांचे दर्शन घडले. यमुना नदीच्या किनाऱ्यावर बर्नीगाड नावाच्या जागेवरुन जवळच हे मंदिर आहे. 5 / 7मंदिरात एखाद्या मृत शरिराला द्वारपालांसमोर ठेवल्यास, मंदिरातील पुजाऱ्यांनी या शरीरावर पवित्र जल शिंपडल्यास तो मृत व्यक्ती काही काळासाठी जिवंत होतो, असे सांगितले जाते. 6 / 7जिवंत झाल्यानंतर तो परमेश्वराचे नामस्मरण करतो, तेव्हा त्यास गंगाजल पाजण्यात येते. हे गंगाजल पिल्यानंतर ते शरीर पुन्हा मृत अवस्थेत जाते. 7 / 7दरम्यान, या आश्चर्यकारक घटनेचं नेमकं रहस्य काय, हे कोणालाही माहिती नाही, सांगता येत नाही. या मंदिराच्या पलिकडे दोन द्वारपाल आहेत, ज्यापैकी एकाचा हात तुटलेला आहे, हे नेमकं का आहे, हेही एक गुढ आहे.