अर्ध्या वयाच्या प्रियकरासोबत फरार झाली ४० वर्षीय चार लेकरांची आई, पती करतोय न्यायाची मागणी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 11:58 IST
1 / 11उत्तराखंडच्या रूडकीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एक चार मुलांची आई असलेली महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. 2 / 11आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचं वय ४० वर्षे तर तिच्या प्रियकराचं वय २० वर्षे आहे. आता या महिलेा पती चारही मुलांना घेऊन न्यायाची मागणी करत आहे. 3 / 11चार मुलांची आई असलेल्या महिलेचं त्यांच्याच भागात राहणाऱ्या एका अविवाहित आणि तिच्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. 4 / 11काही दिवस त्यांचं हे प्रकरण गपचूप सुरू होतं. पण हे प्रकरण फार काळ लपून राहू शकलं नाही. 5 / 11जसं त्यांचं प्रकरण उघड झालं दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पती मुलांना घेऊन तक्रारीसाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.6 / 11असे सांगितले जात आहे की, तो अनेक दिवसांपासून मुलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचत होता. तो पोलिसांना पत्नीला शोधण्याची विनंती करत होता. 7 / 11पोलिसांनी तपास सुरू केला आणि पळून गेल्यानंतर २० दिवसांनी समजले की, ते दोघे उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये आहेत. त्यानंतर महिलेला परत आणलं गेलं.8 / 11असं असलं तरी महिलेचा कथित प्रेमी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ८ मार्च महिला दिवसाला तिला घेऊन कोतवाली सिविल लाइन्सला पोहोचली. 9 / 11त्यासोबतच महिलेच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली. महिलेला समजावण्यात आले. पण ती कुणाचं काही ऐकायला तयार नाही. 10 / 11या महिलेने स्पष्टपणे सांगितले की ती तिच्या पतीकडे जाणार नाही. तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं आहे. पोलिसांसोबतच इतरही लोकांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. 11 / 11पण तिच्या डोक्यात प्रेमाचं असं भूत शिरलं आहे की, तिला मुलांचीही चिंता नाही. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणावर परिवारातील लोकांनीच निर्णय घ्यावा. सध्या या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे. तर लोकांना तिच्या चार मुलांची चिंता आहे.