By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 16:38 IST
1 / 10आजच्या तारखेला सोन्याचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की सर्वसामान्य माणूस सोनं खरेदी करण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. भारतात सोन्याची किंमत १० ग्रामला ५० हजार रूपये इतकी आहे. कोरोनामुळे बाजाराची अवस्थासुद्धा खूप खराब आहे. आता एका अश्या घराची विक्री सेलमध्ये होणार आहे. ज्या घरात फक्त सोनचं सोन आहे.2 / 10हे घर इज्राईलच्या कायसैरा शहरात आहे. या संपूर्ण घराला मार्बल फ्लोरिंग करण्यात आले आहे. तसंच या घरात प्रायव्हेट स्पा आणि फिटनेस कल्ब सुद्धा आहे. ही सोन्याची संपत्ती प्रसिद्ध व्यावसाईक वलेरी कोगन यांची आहे. या संपूर्ण घराची किंमत १ खराब ८२ अब्ज ९८ कोटी ६२ लाख आणि ५० हजार (१,८२,९८,६२,५०,०००) इतकी आहे. वलेरी कोगन यांच्याकडे विमानतळाचे मालकी हक्क आहेत.3 / 10सध्या हे आलिशान घर मार्केट सेलमध्ये उतरवण्यात आले आहे. अनेक वास्तूकलांचा अविष्कार या महालात पाहायला मिळतो. २०१४ मध्ये वलेरी कोगन यांच्या नावाचा समावेश सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादी होता. या यादीत वलेरी यांचा क्रमांक ४१ सावा होता. 4 / 10मार्बलसोबतच मोठे मोठे झुंबरसुद्धा या घराला लावलेले आहेत. घराच्या किचनमध्ये आगळया वेगळ्या डिजाईन्स तुम्हाला दिसून येतील. 5 / 10या प्रशस्त महालातील जीमची उपकरणंही सोन्याची आहेत. 6 / 10या घरात पाच मोठे बाथरूम आणि दोन लहान बाथरूम्स आहेत.7 / 10या महालाच्या आवारात पाण्याचे फाऊंटन सुद्धा आहे. 8 / 10परदेशातील लोकसुद्धा हा महाल बाहेरून पाहण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात.9 / 10इतकं सुंदर बांधकाम आणि रचना तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.10 / 10या घराचा डायनिंग हॉल खूपच प्रशस्त आहे.