शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील एक असा देश जिथे पाणी मिळतं खूप महाग, पण हॉटेल्समध्ये बिअर दिली जाते फ्री...फ्री...फ्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:20 IST

1 / 7
Country Which Provide Free Beer In Hotels: पेयांमध्ये दारू सगळ्यात महाग असते आणि पाणी सगळ्यात स्वस्त असतं असंच सामान्यपणे बघायला मिळतं. पण आपल्याला वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल की, जगात एक असा देश आहे जिथे पाण्याच्या एका बॉटलच्या किंमतीत आपण चक्क २ ग्लास बिअर पिऊ शकता.
2 / 7
व्हिएतनाम हा आशियातील एक छोटा देश आहे. जगभरात देशात सगळ्यात स्वस्त बिअर मिळते. इथे बिअरला बिया होई असं म्हटलं जातं. कमालीची बाब म्हणजे येथील अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना फ्रीमध्ये बिअर दिली जाते. महत्वाची बाब म्हणजे ही सुविधा ५ स्टार हॉटेल्समध्येही मिळते.
3 / 7
व्हिएतनाममध्ये रस्त्यावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टमध्ये १ ग्लास बिअर ५००० ते १०,००० व्हिएतनामी डोंग म्हणजेच भारतीय करन्सीनुसार साधारण १८ ते ३५ रूपयांना मिळते. तेच इथे ५०० मिलीची पाण्याची एक बॉटल जवळपास १०० रूपयांना मिळते. म्हणजे इथे आपण आरामात एका पाण्याच्या बॉटलच्या किंमतीत २ बिअर पिऊ शकता.
4 / 7
व्हिएतनाममध्ये प्रत्येक ठिकाणी फ्रेश आणि विना ब्रॅडची बिअर मिळते. ही बिअर स्थानिक ब्रुअरीजमध्ये तयार केली जाते आणि फ्रेशच विकली जाते. ही बॉटल्समध्ये पॅक केली जात नाही. ज्यामुळे दुकानदार एकाच दिवसात स्टॉक संपवण्यासाठी ही स्वस्त विकतात.
5 / 7
व्हिएतनामच्या बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण केवळ २ ते ३ टक्केच असतं. ही बिअर बनवण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. जे व्हिएतनाममध्ये फार स्वस्त मिळतात. त्याशिवाय सरकारही फ्रेश बिअरवर फार कमी टॅक्स लावतात, त्यामुळे इथे स्वस्तात बिअर मिळते.
6 / 7
व्हिएतनाममध्ये नळाचं पाणी पिणं योग्य मानलं जात नाही. येथील हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या पाण्यात ब्रॅंडिंग, प्लास्टिक आणि टान्सपोर्टचा खर्चही येतो. त्यामुळे ते बिअरपेक्षाही महाग असतं. तसेच व्हिएतनाममध्ये बिअरला एक सामाजिक परंपराही मानलं जातं, त्यामुळे सुद्धा ती स्वस्त मिळते.
7 / 7
व्हिएतनाम जगातील अशा देशांमध्ये येतं, जिथे प्रति व्यक्ती बिअरची विक्री सगळ्यात जास्त आहे. कारण इथे बिअर चहा-कॉफी इतकीच स्वस्त मिळते. व्हिएतनामशिवाय चेक रिपब्लिक, चीन आणि यूक्रेनमध्येही बिअरची किंमत पाण्यापेक्षाही स्वस्त असते.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सVietnamविएतनामJara hatkeजरा हटके