शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Roopkund Lake एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात सापडले ५०० पेक्षा जास्त मानवी सांगाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 5:08 PM

1 / 8
रूपकुंड सरोवर उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात आहे. हे सरोवर किनाऱ्यावर सापडलेल्या ५०० पेक्षा अधिक मनुष्यांच्या सांगाड्यामुळे चर्चेत आहे. हे ठिकाणी हिमालयावर जवळपास ५०२९ मीटर उंचीवर आहे.
2 / 8
१९४२ मध्ये एच.के.माधवल तिथ वनरक्षक होते. तेव्हा त्यांनी रूपकुंड सरोवरात हे मानवी सांगाडे पाहिले. १९६० मध्ये इथे कार्बन डेटिंग करण्यात आली. याने समजलं की, हे सांगाडे साधारण १२०० वर्ष जुने आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या लोकांचा मृत्यू एखाद्या महामारीमुळे, भूस्खलनामुळे किंवा बर्फाच्या वादळामुळे झाला असावा.
3 / 8
भारतीय आणि यूरोपिय वैज्ञानिकांच्या एका टीमने २००४ मध्ये या ठिकाणाचा दौरा केला होता. त्यांनी सांगाड्याबाबत माहिती गोळा करण्यासाठी सांगाड्यांचे दागिने, खोपडी, हाडे गोळा करून रिसर्च सुरू केला.
4 / 8
हाडांच्या डीएनएवरून समजलं की, सरोवरात सापडलेली हाडे वेगवेगळ्या समूहातील लोकांची आहेत. यात एक समूह कमी उंचीच्या लोकांचा होता. असं मानलं जातं की, हे लोक कदाचित स्थानिक निवासी होते आणि कुलीच्या रूपात समूहासोबत असावेत. यात महाराष्ट्रातील कोकणी ब्राम्हणांचाही एक समूह सापडला.
5 / 8
रूपकुंडमध्ये साधारण ५०० पेक्षा जास्त सांगाडे सापडले होते. असं मानलं जातं की, मरणाऱ्यांची संख्या ६०० पेक्षा जास्त असेल. हे सांगाडे १२०० वर्ष जुने आहेत.
6 / 8
भारतीय-यूरोपिय वैज्ञानिकांचा समूह या सांगाड्यांवर लागोपाठ हैद्राबाद, पुणे आणि लंडनमध्ये रिसर्च करत होता. प्रश्न हा होता की, इतक्या मोठ्या समूहाचा मृत्यू अचानक कसा झाला. त्यांचे मृतदेह सरोवरात कसे पोहोचले. तपासातून समोर आलं की, लोकांचा इतका मोठा समूह कोणत्याही आजारामुळे मृत्यूमुखी पडला नाही. ते हिमालयात आलेल्या बर्फाच्या वादळाने मरण पावले होते.
7 / 8

8 / 8

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स