चीनमध्ये सडलेल्या टोमॅटोंना मिळत आहे सोन्याचा भाव, जाणून घ्या कसे चीनी शेतकरी होताहेत कोट्याधीश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:14 IST
1 / 7भारतामध्ये जेव्हा भाज्यांचे दर घसरतात तेव्हा शेतकरी त्या रस्त्यावर फेकत आपलं संताप व्यक्त करतात. अनेकदा टोमॅटो, कोबी, बटाट्यांची अशी वाया जाणारी दृश्यं आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पाहतो. पण चीनमधील शेतकरी असं करत नाहीत. तिथे शेतकरी टोमॅटो फेकण्याऐवजी त्यांना वाळवून कोट्यवधींची कमाई करतात.2 / 7सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये बघायला मिळतं की, चीनमधील शेतकरी टोमॅटो अर्धे कापून उन्हात वाळवतात. ते मधला भाग काढून मोठ्या ट्रेमध्ये पसरवतात आणि 3 ते 5 दिवस उन्हात ठेवतात. उन्हाच्या तापमानामुळे टोमॅटोमधील पाणी आटतं आणि ते छोटे, कुरकुरीत होतात.3 / 7वाळवल्यानंतर शेतकरी त्या टोमॅटोंवर मीठ किंवा खास अँटी-फंगल पावडर शिंपडतात. यामुळे टोमॅटो अनेक महिने खराब होत नाहीत आणि बाजारात सहज विकले जातात.4 / 7जिथे एक किलो कच्चे टोमॅटो फक्त 10 रुपयांना विकले जातात, तिथे वाळवून आणि पॅकिंग करून तेच टोमॅटो 500 ते 1000 रुपये किलोपर्यंत विकले जातात. म्हणजे शेतकऱ्यांना 50 ते 100 पट जास्त नफा मिळतो. हेच कारण आहे की, चीनमधील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो-कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.5 / 7भारतामध्ये मात्र शेतकरी भाव कमी झाल्यावर भाज्या वाया घालवतात. पण जर त्यांनीही चीनप्रमाणे भाज्या वाळवून विकल्या तर त्यांचं उत्पन्न अनेक पटींनी वाढू शकतं. हा उपाय फक्त वाया जाणं थांबवणार नाही, तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल.6 / 7तज्ज्ञांचं मत आहे की भारतातही भाज्या वाळवून संरक्षित करण्याची पद्धत सहज स्वीकारली जाऊ शकते. सूर्यप्रकाश, स्वस्त मशीन आणि योग्य पॅकेजिंगच्या मदतीनं शेतकरी आपला तोटा मोठ्या नफ्यात बदलू शकतो. हा उपाय भारतीय शेतीसाठी गेमचेंजर ठरू शकतो.7 / 7चीनची ही टेक्निक भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठा धडा आहे की भाज्या वाया घालवण्याऐवजी त्यांना साठवून विकणेच शहाणपणाचं आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खिशे भरतील आणि देशातील अन्नाची नासाडीही कमी होईल.