1 / 7Top Highest Earning Trains : भारतात रोज लाखो लोक आपल्या ठिकाणावर पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. देशाच्या वेगवेगळ्या भागात रोज तब्बल १३ हजारांपेक्षा जास्त रेल्वे धावतात. यात वेगवेगळ्या रेल्वेंचा समावेश असतो. रेल्वेचा प्रवास आरामदायक तर असतोच, सोबतच खिशाला परवडणारा देखील असतो. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. असाही अनुभव आला असेल की, काही रेल्वेंना फारच डिमांड असते. म्हणजे रेल्वेचं बुकिंग सुरू होताच, काही वेळातच तिकीट संपतात. आता सगळ्यात जास्त डिमांड असणाऱ्या रेल्वे कोणत्या आणि त्यांची कमाई किती? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. अशात रेल्वे विभागाला दरवर्षी सगळ्यात जास्त कमाई करून देणाऱ्या ५ रेल्वे आपण पाहणार आहोत. 2 / 7केएसआर बंगळुरू राजधानी एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन ते बंगळुरूपर्यंतचा प्रवास करते. या रेल्वेने वर्षाला ५ लाखांपेक्षा जास्त लोक प्रवास करतात. ही भारतीय रेल्वेची कमाईच्या बाबतीत स्टार रेल्वे आहे. ही रेल्वे वर्षाला साधारण १७६ कोटी रूपये इतकी कमाई करते.3 / 7सगळ्यात जास्त कमाई करणारी दुसरी रेल्वे आहे सियालदाह राजधानी एक्सप्रेस. ही रेल्वे राजधानी दिल्लीहून निघते आणि सियालदाह / कोलकातापर्यंत धावते. या रेल्वेची वर्षाची कमाई साधारण १२८ कोटी रूपये इतकी सांगितली जाते. तर यातून वर्षाला साधारण ५ लाख लोक प्रवास करतात.4 / 7डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेसचा नंबर या यादीत तिसरा लागतो. ही रेल्वे नवी दिल्ली ते डिब्रूगढपर्यंत धावते. या रेल्वेच्या माध्यमातून वर्षाला १२६ कोटी रूपये इतकी कमाई होते. याद्वारे दरवर्षी साधारण ४.७५ लाख लोक प्रवास करतात. 5 / 7कमाईच्या बाबतीच चौथ्या नंबरवर मुंबई तेजस राजधानी एक्सप्रेस येते. ही रेल्वे नवी दिल्ली / हजरत निजामुद्दीनहून निघून मुंबईला पोहोचते आणि दरवर्षी साधारण १२२ कोटी रूपये इतकी कमाई रेल्वे विभागाला करून देते. 6 / 7डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेसची दुसरी सर्व्हिस देणारी रेल्वे कमाईच्या बाबतीत पाचव्या नंबरला आहे. ही रेल्वे वर्षाला साधारण ११६ कोटी रूपये कमाई करून देते. या रेल्वेने साधारण सव्वा चार लाख लोक प्रवास करतात. 7 / 7नवीन प्रीमियम गाड्या जसे Vande Bharat Express या महागड्या तिकिटांमुळे चर्चेत असल्या, तरी प्रवाशांची मोठी क्षमता आणि सातत्याने होणारी गर्दी यामुळे Rajdhani Express तसेच लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्याच भारतीय रेल्वेच्या प्रवासी महसुलाचा मुख्य आधार ठरत आहेत.