नादच खुळा! सुनेच्या इच्छेसाठी सासऱ्यानं थेट हेलिकॉप्टर मागवलं; पाठवणीसाठी अख्ख्या गावाची गर्दी

By manali.bagul | Published: December 11, 2020 01:46 PM2020-12-11T13:46:53+5:302020-12-11T14:03:57+5:30

राजस्थानच्या भरतपूरमधील एक नवरी चर्चेचा विषय ठरली आहे. भरतपूरजवळ असलेल्या छतरपूर या गावातील लोकांना अशी आगळी वेगळी पाठवणी पहिल्यांदाच पाहायला मिळाली. या ठिकाणी लग्न झाल्यानंतर मुलीची पाठवणी करण्यासाठी थेट हेलिकॉप्टर बोलवण्यात आलं होतं. तब्बल पाच लाख रूपये खर्च करून हे हेलिकॉप्टर मागवण्यात आलं होतं.

भरतपुरच्या करौली गावातील बिडगमा येथील रहिवासी असलेल्या पीडब्लूडी अधिकाऱ्याच्या मुलीचे लग्न छतरपूरचा रहिवासी असलेल्या मुलाशी ठरले. गेल्या काही दिवसात नरेंद सिंह हे छतरपूरला पोहोचले. गुरूवारी सकाळी मुलीची पाठवणी होणार होती. विदाई हेलकॉप्टरने व्हावी अशी मुलीची इच्छा होती. जेव्हा सासऱ्यांना सुनेच्या या इच्छेबाबत कल्पना आली तेव्हा त्यांनी एक मोठा प्लॅन तयार केला.

लग्नाचे अनेक कार्यक्रम सुरू होते. त्याचवेळी छतरपूरच्या आकाशात एक हेलिकॉप्टर उडताना दिसले. गावात एक हॅलिपॅड तयार करण्यात आला होता. जेव्हा हेलिकॉप्टरवरची गावात लँडींग झाली. तेव्हा ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. गावातील लोकांमध्ये खूप उत्साह दिसून येत होता.

लग्नाचे संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर नवऱ्याकडच्या मंडळीने आपलं गाव बिडगमा येथे नवरीला घेऊन जाण्याची तयारी केली. इतकचं नाही मुलीच्या सासरच्या गावातील लोक सुद्धा हेलिकॉप्टरमधून येत असलेल्या सुनेला पाहण्यासाठी खूप उत्सूक होते.

हेलिकॉप्टर जसा बिडगमा गावात पोहोचला तसं कुटूंबातील लोकांनी नवरा आणि नवरीचे स्वागत करण्याची तयारी केली. नवरी आल्यानंतर गावातील लोक हेलिकॉप्टर बघण्यात व्यस्त होते.

कुटूंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरची पाठवणी करण्यासाठी जवळपास ५ लाख रूपयांचा खर्च आला. सुनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सासऱ्यांनी दिलेलं हे अनोखं गीफ्ट होतं.