शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातला सर्वात खतरनाक पक्षी, १८ हजार वर्षाआधी पाळत होते लोक; आता झालाय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 18:33 IST

1 / 7
तुम्हाला जगातील सर्वात खतरनाक पक्षी कॅसोवरीबाबत माहीत आहे का? कदाचित क्वचितच लोकांना या पक्षाबाबत माहीत असेल. या पक्ष्यांची तुलना डायनासोरसोबत होते. मनुष्य हजारो वर्षाआधीच हे पक्षी पाळणं शिकले होते. सध्या हे पक्षी चर्चेत आहेत कारण कॅसोवरीमुळे काही लोकांचा जीव गेला आहे.
2 / 7
ही कहाणी आहे जगातल्या सर्वात खतरनाक पक्ष्याची. हा पक्षी त्याच्या टोकदार चाकूसारख्या पायांच्या नखामुळे फार खतरनाक मानला जातो. प्राचीन काळात मनुष्य हे प्राणी पाळत होते. त्यांचं मांस खात होते.
3 / 7
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, एका नव्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, मनुष्यांनी पोपट, कबूतर आणि कोंबड्या पाळणं शिकण्याच्या खूपआधी कॅसोवरीसारखे आक्रामक पक्षी पिंजऱ्यात केले होते.
4 / 7
या विषयात अमेरिकेची पेन युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसर क्रिस्टीना डगलस म्हणाल्या की, काही जीवाश्मांवरून हे समजतं की, मनुष्यांनी कॅसोवरीचं पोलन पोषण करणं १८ हजार वर्षाआधी सुरू केलं होतं.
5 / 7
हे पक्षी दिसायला मोठा आणि हिंसक असतात. ते मनुष्यांचा जीव घेऊ शकता. ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीमध्ये आढळणारे कॅसोवरीकडून त्यांची अंडी घेणं सोपं काम नाहीये. पण हजारो वर्षाआधी मनुष्यांनी या प्राण्यांची स्थिती बेकार केली होती. यांच्यावर शोध करणाऱ्या प्रोफेसरनुसार, कॅसोवरीचं मांस आणि पंखांचा वापर करण्यासाठी त्यांना पाळलं जात होतं.
6 / 7
यांचे पाय जाड आणि नखे खूप टोकदार असतात. त्यामुळे हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा जास्त शक्तीशाली मानला जातो. हे पक्षी दरवर्षी आपलं घरटं बदलणं पसंत करतात.
7 / 7
२०१९ मध्ये फ्लोरिडामध्ये परदेशी जनावरांच्या एका मालकाला कॅसोवरीने बागेत मारलं होतं. रिसर्चरनुसार, कॅसावेरी पक्ष्यांना तेव्हा पकडलं जेव्हा ते कमजोर होते. लोकांनी मेल कॅसावेरीची शिकार केली आणि मग त्यांची अंडी आपल्यासोबत घेऊन गेले. कॅसावेरी पक्ष्यांना आजही पपाया न्यूगिनीमद्ये त्यांच्या पंखांसाठी पाळलं जातं. त्यांच्या अंड्यांना नॅशनल फूडचा दर्जा दिला आहे.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेwildlifeवन्यजीव