शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 9:22 PM

1 / 9
व्हंटाब्लॅक हा जगातील सर्वात गडद पदार्थ आहे. ब्रिटनच्या सरे नॅनोसिस्टम्सनं या पदार्थाची निर्मिती केली आहे. कार्बन ट्यूब्सच्या माध्यमातून या पदार्थाची निर्मिती करण्यात आली.
2 / 9
ग्लॅकस अटलांटिकस हा मासा एलियनसारखा दिसतो. ब्ल्यू एंजल नावानं तो प्रसिद्ध आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर हा मासा आढळून येतो.
3 / 9
एरोजेल हा पदार्थ ढगासारखा दिसतो. जेल आणि गॅसच्या मिश्रणातून हा पदार्थ तयार करण्यात आला आहे. गोठलेला धूर किंवा स्थायूरुपातला बर्फ या नावानं हा पदार्थ ओळखला जातो.
4 / 9
यूकलेप्टस डेगलप्टा झाडांचं खोड विविध रंगांचं असतं. या झाडाचं खोड निळ्या, केशरी, जांभळ्या, हिरव्या आणि तपकिरी रंगाचं असतं.
5 / 9
कोलंबियात जमिनीखाली एक कॅथड्रेल आहे. हे संपूर्ण कॅथड्रेल मिठापासून तयार करण्यात आलेलं आहे. 1954 मध्ये या कॅथड्रेलची उभारणी करण्यात आली.
6 / 9
गॉबलिन शार्क हा जगातील दुर्मिळ माशांपैकी एक आहे. जिवंत जीवाश्म असं या माशाचं वर्णन केलं जातं.
7 / 9
इंडोनेशियातल्या कवाह इजेन ज्वालामुखीतून निळा धूर निघतो. ज्वालामुखीतून बाहेर निघणाऱ्या लाव्हारसात सल्फर वायूचं प्रमाण अधिक असल्यानं असं घडतं.
8 / 9
इथियोपितील एक परिसर जणू परिग्रहावरचा वाटतो. अफर ट्रँगल भागात असणाऱ्या भूभागातून लाव्हारस बाहेर पडतो. या भागातून नियॉन रंगाचे गरम झरे निघतात.
9 / 9
टार्डिग्रेड्स हा सूक्ष्मजीव कोणत्याही परिस्थितीत जीवंत राहू शकतो. -200 अंश सेल्सिअस तापमान असो वा 149 अंश सेल्सिअस तापमान, टार्डिग्रेड्स त्या ठिकाणी तग धरु शकतो.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEarthपृथ्वी