तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:58 IST
1 / 9रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. तसेच, या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवावे, असे म्हटले आहे. यानंतर, काही लोक न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत, यानिर्णयामुळे रेबीज तथा कुत्र्यांच्या चाव्यापासून संरक्षण होईल, असे म्हणत आहेत. तर काही लोक हे अमानवी असल्याचे बोलत आहेत. असो... 2 / 9पण हे कुत्रे रस्त्यावर कार अथवा बाईक आदी वाहनांच्या मागे धावताना आपण अनेक वेळा बघितले असेल. कदाचित असा प्रसंग कधी आपल्यासोबतही घडला असेल. यामुळे बाईक अथवा कार चालकांना प्रचंड त्रास होतो. अशा स्थितीत, मनात प्रश्न येतो की, कुत्रे असे का करतात? तर जाणून घेऊयात.3 / 9का वाहनांमागे धावतात कुत्रे ? - खरे तर, कुत्रे तुमच्या वाहनामागे लागणे अथवा धावणे, यात तुमचा काहीच दोष नाही. तर दोष आहे तो तुमच्या टायरचा. वैज्ञानिकांच्या मते, कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता प्रचंड असते. हे कुत्रे तुमच्या टायरवर असलेल्या इतर कुत्र्यांचा वास लगेच ओळखतात. 4 / 9जेव्हा कुत्रा वाहनाच्या टायरवर लघवी करतो, तेव्हा तो तेथे त्याचा वास सोडत असतो. हाच वास कुत्र्यांना त्यांच्या प्रदेशाची माहिती देतो.5 / 9कुत्रे त्यांच्या प्रदेशाचे संरक्षण करतात... - जर एखाद्या परिसरातील कुत्र्याने तुमच्या वाहनाच्या टायरवर त्याचा वास सोडला असेल आणि तुमचे वाहन दुसऱ्या रस्त्यावरून अथवा परिसरातून जात असेल, तर त्या ठिकाणच्या कुत्र्यांना हा वास जाणवतो. यामुळे आपल्या परिसरात बारच्या कुण्या कुत्र्याने प्रवेश केला आहे असे त्यांना वाटते. 6 / 9हा बाहेरच्या कुत्र्यांचा प्रवेश त्यांना सहन होत नाही. म्हणून ते तुमच्या वाहनाच्या मागे लागतात, कारण ते त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करत असतात.7 / 9हे देखील एक कारण - महत्वाचे म्हणजे, आपल्या वाहनामागे कुत्रे धावण्याचे कारण केवळ हा वास नाही, तर कधीकधी त्यांचा एखादा सहकारी कुत्रा एखाद्या वाहनाने जखमी झाला असेल अथवा मारला गेला असेल, तर ते वाहन त्यांच्यासाठी धोक्याचा संकेत बनते. यामुळे, संबंधित ठिकाणचे कुत्रे ते वाहन अथा तशा प्रकारचे वाहन त्यांच्या परिसरात आले की आक्रमक होतात. त्या वाहनाचा पाठलाग करतात. 8 / 9अनेक वेळा हा पाठलाग खेळासारखाही असू शकतो. धावत्या वाहनांमुळे कुत्र्यांची शिकार करण्याची अथवा धावण्याची प्रवृत्ती जागृत होते. यामुळे कधी कधी हे कुत्रे रागाशिवायही केवळ गम्मत म्हणूनही वाहनांमेगे धावतात.9 / 9अनेक वेळा हा पाठलाग खेळासारखाही असू शकतो. धावत्या वाहनांमुळे कुत्र्यांची शिकार करण्याची अथवा धावण्याची प्रवृत्ती जागृत होते. यामुळे कधी कधी हे कुत्रे रागाशिवायही केवळ गम्मत म्हणूनही वाहनांमेगे धावतात.