लॉकडाऊनमध्ये फ्री Porn बघण्यासाठी भारतीयांची मोठी झुंबड, वाढलेली आकडेवारी बघून डोळे फिरतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 10:01 AM2020-04-08T10:01:18+5:302020-04-08T10:18:15+5:30

पॉर्नहबने त्यांचं स्टेहोमहब कॅम्पेनही सुरू केलं आहे. आणि लोकांचा कंटाळा दूर करण्यासाठी मोफत प्रिमिअम सदस्यताही देत आहेत.

लॉकडाऊननंतर अशी कथित माहिती समोर आली होती की, लोकांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान घरात रहावं म्हणून भारतातील बहुतेक पॉर्न साइटवरील बंदी काही काळासाठी हटवण्यात आली होती. अनेक साईट्स सहजपणे ओपन करता येत आहेत. अनेक साईट्सनी तर मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे.

.indiatimes.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अशात pornhub.com आणि xvideos.com या दोन साईट्स ओपन होत नव्हत्या. पण pornhub.org सहीत अनेक साईट्स आरामात सर्फ करता येत आहेत.

पॉर्नहबने त्यांचं स्टेहोमहब कॅम्पेनही सुरू केलं आहे. आणि लोकांचा कंटाळा दूर करण्यासाठी मोफत प्रिमिअम सदस्यताही देत आहेत. (Image Credit : thesmartlocal.com)

21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान भारतातील लोक घरात आहेत. यावर करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे की, जास्तीत जास्त लोक लॉकडाऊन दरम्यान पॉर्नोग्राफीचा आनंद घेत आहेत आणि आरामात आयसोलेशनचा वेळ काढत आहेत.

पॉर्नहबकडून 2 एप्रिलला जारी करण्यात आलेल्या ट्रॅफिक डेटानुसार, 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर भारतीयांची या साईट्सवर पॉर्न बघण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे.

भारतीयांसाठी आनंदाची बाब ही ठरली की, लॉकडाऊन दरम्यान पॉर्नहबने त्यांची प्रीमिअन सेवा एक महिन्यासाठी मोफत केली होती.

पॉर्नहबच्या रेकॉर्डनुसार, मार्च महिन्यात या साईटवर भारतातील किती लोकांनी भेट दिली याची आकडेवारी समोर आली आहे.

पंतप्रधानांनी 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली होती आणि 27 मार्चपर्यंत पॉर्नहबवर भारतातील ट्रॅफिक तब्बल 95 टक्क्यांनी वाढलं आहे. म्हणजे पॉर्न बघणाऱ्यांची संख्या 95 टक्क्यांनी वाढली आहे.

त्यानंतर एकाच आठवड्यात थोडी कमतरता आढळून आली. 1 एप्रिलला ही टक्केवारी 64 टक्के इतकी आढळून आली. ज्याचा असा अर्थ होतो की, भारतीय स्पष्टपणे सोशल डिस्टेंसिंग आणि मोफत पॉर्नचा मनमुराद आनंद घेत आहेत.

दरम्यान तॉकडाऊनमध्ये पॉर्न बघणाऱ्यांमध्ये केवळ भारतच पुढे नाही तर अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन आणि रशियातही मोठी वाढ बघायला मिळाली आहे.

पॉर्नहबचे उपाध्यक्ष कोरी प्राइस यांच्यानुसार, मोफत पॉर्न दाखवण्या मागचा विचार हा होता की, जास्तीत जास्त लोकांना घरात राहण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि भारतीयांनी यांचं जोरदार स्वागत केलं.