शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Deep Dive Dubai: १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा जगातील सर्वात खोल पूलचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 5:35 PM

1 / 10
पाणी पाहिलं की अनेकांना पोहण्याचा मोह आवरत आहे. पाणी जितकं खोल तितका थरारही अधिक आणि त्याच्याप्रति लोकांचं आकर्षणही वाढत जातं.
2 / 10
दुबईचे क्राऊन प्रिन्स हमदन बिन मोहम्मद अल मकतूम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दुबईच्या डीप डाईव्ह पूलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
3 / 10
त्यांच्या या व्हिडीओनंतर लोकांकडून त्याबद्दल उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत. संपूर्ण जग तुमचं डीप डाईव दुबईमध्ये वाट पाहत आहे, असा संदेशही त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिला आहे.
4 / 10
हा जगातील सर्वात खोल असलेला पूल आहे. याची खोली ६० मीटर म्हणजेच १९६ फुट आहे. क्राऊन प्रिन्स यांनी शेअर केलेल्या व्हिडीओध्ये काही स्विमर्स पूलमध्ये डाईव करताना दिसत आहेत.
5 / 10
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं गेल्या महिन्यात या पूलाच्या खोलीबाबत माहिती पडताळली होती. त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार क्राँक्रिटचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पूलची खोली ६०.०२ मीटर आहे.
6 / 10
याशिवाय यामध्ये अधिक खोल गेल्यावर निरनिराळ्या थीम्सही दिसून येतात. यामध्ये डायविंगच्या अनुभवासाठी अनेक प्रकार वापरण्यात आले आहे.
7 / 10
सुरूवातीला याचा वापर केवळ खासगी वापरासाठी करण्यात येत होता. परंतु या महिन्यापासून सर्वांना या पूलचा आनंद घेता येणार आहे.
8 / 10
डीप डाईव दुबईच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार हा पूल लवकरच सर्वांसाठी खुला केला जाणार आहे. तसंच सर्वांना याचा अनुभव घेता येणार आहे.
9 / 10
या पूलच्या ओपनिंगशी निगडीत सर्व अपडेट्ससाठी आपल्याशी जोडून राहण्याचं आवाहनही त्यांनी केला आहे.
10 / 10
यापूर्वी जगातील सर्वात खोल असलेल्या पूलाचा विक्रम पोलंडच्या डीपस्पॉटच्या नावे होते. याची खोली ४५.५ मीटर म्हणजेच १५० फूट होती.
टॅग्स :DubaiदुबईSwimmingपोहणेInternationalआंतरराष्ट्रीय