शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतातील एकुलती एक रेल्वे, ज्यात वर्षभर फ्री प्रवास करतात लोक; पाहा कुठून कुठे धावते ही खास रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:20 IST

1 / 6
India only Free Train : भारतात रोज १३ हजारांपेक्षा अधिक रेल्वे धावतात, ज्या २ ते अडीच कोटी लोकांना रोज आपल्या ठिकाणावर पोहोचवतात. रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं तर तिकीट घ्यावं लागतं. विना तिकीट प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण आज आम्ही आपल्याला अशा रेल्वेबाबत सांगतोय, ज्यात प्रवास करण्यासाठी आपल्याला तिकीटाची अजिबात गरज नाही. इतकंच नाही तर टीटीईची भीतीही नाही. या रेल्वेत आपण वर्षभर फ्री प्रवास करू शकता. ही भारतातील एकुलती एक फ्री रेल्वे आहे.
2 / 6
भारतातील एकुलत्या एका फ्री रेल्वेचं नाव 'भाक्रा-नंगल ट्रेन' आहे. पंजाब आणि हिमाचल प्रदेशादरम्यान धावणाऱ्या या रेल्वेमध्ये लोक विना तिकीट वर्षभर प्रवास करतात. रोज ८०० ते १००० लोक या रेल्वेने प्रवास करतात. १९४८ पासून ही रेल्वे गेल्या ७५ वर्षांपासून लोकांसाठी फ्री चालवली जाते.
3 / 6
आश्चर्याची बाब म्हणजे या रेल्वेचं व्यवस्थापन भारतीय रेल्वेकडून नाही तर भाखडा व्यास मॅनेजमेंट बोर्डाकडे आहे. या रेल्वेचा उद्देश भाक्रा आणि नंगल दरम्यान परिवहनाचं साधन उपलब्ध करून देणं आहे. सुरूवातीला या रेल्वेचा वापर कर्मचारी, मजूर, बांध बांधण्यासाठी मशीनरी आणि साहित्य वाहून नेण्यासाठी केला जात होता.
4 / 6
ही रेल्वे पाहण्यासाठी आणि यातून प्रवास करण्यासाठी जगभरातून लोक येतात. प्रसिद्ध भाक्रा - नंगल बघण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेने प्रवास करावा लागतो. लाकडाचे डबे असलेल्या रेल्वेत आधी स्टीम इंजिन लावलेलं होतं, पण नंतर बदलून डिझेल इंजिन लावण्यात आलं. भाक्रा - नंगल रेल्वे १३ किलोमीटर धावते. शिवालिक डोंगराला कापून या रेल्वेसाठी ट्रॅक बनवण्यात आलाय. या रेल्वे ट्रॅकवर तीन टनल आहेत आणि सहा स्टेशन आहेत.
5 / 6
या रेल्वे मार्गादरम्यान गावातील लोक या रेल्वेने प्रवास करतात. त्याशिवाय भाखडा - नंगल प्रोजेक्टचे कर्मचारी, विद्यार्थी आणि टूरिस्ट या रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद घेतात. रेल्वे फ्रीमध्ये चालवली जाते म्हणून रेल्वेचा सगळा खर्च भाखडा नंगल मॅनेजमेंट द्वारे केला जातो. २०११ मध्ये मॅनेजमेंटने फ्री रेल्वे रोखण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर असं ठरलं की, ही रेल्वे उत्पन्नासाठी नाही तर परंपरेसाठी चालवली जाईल.
6 / 6
या रेल्वेचे कोच लाकडापासून बनवण्यात आले आहेत, जे १९२३ मध्ये कराचीमध्ये बनवण्यात आले होते. आधी या रेल्वेत १० कोच होते, पण नंतर खर्च कमी करण्यासाठी कोचची संख्या कमी करून तीन करण्यात आली. या रेल्वेतून कमाई काहीच होत नाही, तरीही ७५ वर्षांपासून ही रेल्वे सुरूच आहे.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे