Baba Vanga Predictions: बाबा वेंगांच्या या भाकितांमुळं जगाला भरलीय धडकी; जाणून घ्या 2023 मध्ये काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 16:35 IST
1 / 6बल्गेरियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांची अनेक भाकीतं आतापर्यंत खरी ठरली आहेत. त्यांच्या भाकितांची सातत्याने चर्चा होताना दिसते. खरे तर, बाबा वेंगा यांनी तब्बल 111 वर्षांपूर्वीच ही भाकीतं वर्तवली आहेत. त्यांच्या या भाकितांकडे संपूर्ण जग गांभीर्याने पाहते. 2 / 6महत्वाचे म्हणजे, बाबा वेंगा यांनी 2022 साठी काही भाकितं केलेली होती. त्यांपैकी आतापर्यंत 2 भाकितं खरी ठरली आहेत. यानंतर आता 2023 च्या भाकितांसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.3 / 62023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलणार? - बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल(Earth's Orbit), याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय 2028 मध्ये अंतराळवीर शुक्र ग्रहावर पोहोचतील. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2046 मध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने लोक 100 वर्षांहून अधिक जगू शकतील.4 / 6यावर्षीत भारतात उपासमारीची शक्यता - द सनच्या एका वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटले होते, की 2022 मध्ये जगभरातील तापमानात घट होईल आणि यामुळे नाकतोड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढेल. भारतावरही यांचा हल्ला होईल. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे भारतात तीव्र उपासमारीची स्थितीही निर्माण होऊ शकते.5 / 6या वर्षात 2 भाकितं ठरली आहे सत्य - बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी 2022 साठी एकूण 6 भविष्यवाण्यात केल्या होत्या. यांपैकी आतापर्यंत 2 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी काही आशियाई देशांमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली होती आणि ऑस्ट्रेलियात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाकिस्तानातही पुरामुळे आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर त्यांनी अनेक शहरांमध्ये पाणीटंचाईचा अंदाजही वर्तवला होता. यानुसार, सध्या पोर्तुगालमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे, तर इटलीमध्ये दुष्काळ आला आहे.6 / 62022 साठीची इतरही भाकितं सत्य होणार? - बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी 2022 मध्ये सयबेरियातून एक नवीन प्राणघातक विषाणू निर्माण होण्याची शक्तता वर्तवली होती. याच बरोबर त्यांनी एलियनचा हल्ला, नाकतोड्यांचा हल्ला आणि वर्च्युअल रिअलटीमध्ये वाढीचीही भविष्यवाणी केली होती.