खोदकाम करताना सापडलं २ हजार वर्ष जुनं कँटिन; अन् डब्बा उघडताच दिसलं असं काही, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 03:04 PM2020-12-27T15:04:30+5:302020-12-27T15:20:28+5:30

खोदकाम किंवा उत्खनन करताना अनेकदा पुरातन संस्कृतीचे दर्शन घडवत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. भूकंप, ज्वालामुखी किंवा मोठ्या आपत्तीत नामशेष झालेल्या अनेक संस्कृतींचा इतिहास हा उत्खनानादरम्यान समोर येतो. (image Credit- Getty images)

इटलीतील पोम्पोई शहरात करण्यात आलेल्या उत्खननात असाच एक प्रकार समोर आला आहे. इटलीतील एक शहर ज्वालामुखीमुळे संपूर्ण उद्धवस्त झालं होतं. आता या शहराच्या खोदकामादरम्यान इतिहासकारांना अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे पुरावे मिळत आहे.

दोन हजार वर्षांपूर्वी माती खाली दाबलं गेलेलं एक कँटीन खोदकामात दिसून आलं आहे. या कँटीनमध्ये काही डब्बे सापडले आहेत. या डब्यांमध्ये काही खाण्याच्या वस्तू असाव्यात असा अंदाज लावला जात आहे. या कँटीनमध्ये मेन्यू कार्ड भीतींवर छापण्यात आले होते. पारंपारिक चुल्हासुद्धा आढळला आहे. जेवण गरम करण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जात होता.

हे कँटीन स्वीड फूडच्या दुकानांप्रमाणे आहे. या ठिकाणी गरमागरम ड्रिक्स आणि जेवणसुद्धा मिळत असावं. या कँटीनमध्ये काही अन्नपदार्थाचे, प्राण्याच्या हाडांचे घटक सुद्धा मिळाले आहे. यात लहानश्या कुत्र्याची हाडं सुद्धा मिळाली आहेत.

इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार या पुराव्यांच्या आधारे त्या लोकांच्या जीवनाबाबत माहिती मिळवणं सोपं होईल.

या वस्तूंवरून असं दिसून आलं की, या कँटीनमध्ये श्रीमंत नाही तर गरिब, सर्वसामान्य लोक जेवायला येत होते.

या ठिकाणी काही हाडं तर काही वाईन्सच्या बॉटल्स मिळाल्या आहेत. तेलाचं भांड, गरम जेवण करण्याचे भांड सुद्धा या ठिकाणी सापडलं आहे.

या ठिकाणी काही मानवी हाडं सुद्धा सापडली आहेत. ही हाडं स्वयंपाक करणारे लोक किंवा ग्राहकांची असावीत असा अंदाज लावला जात आहे. (image Credit- Getty images, asianetnews)

Read in English