शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टीलचा बॉल नाही 'ही' जगातली सर्वात महाग वस्तू, याच्या एका ग्रॅमच्या किंमतीत विकत घ्याल अनेक छोटे देश!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 2:50 PM

1 / 8
अलिकडे सोन्या-चांदीचे भाव आकाशाला भिडले आहेत. लोक या वाढत्या किंमतीमुळे हैराण आहेत. सोनं आणि हिऱ्यांचे भाव तर तुम्हाला माहीत असतीलच. पण जगात एक अशी वस्तू आहे ज्याची १ ग्रॅमची किंमत इतकी आहे की, त्यातून तुम्ही काही छोटे देश विकत घेऊ शकता. ही वस्तू आहे एंटीमॅटर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही वस्तू इतकी महाग का आहे? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....
2 / 8
अलिकडे महागाईने सर्वांनाच हैराण करून सोडलं आहे. तुम्हाला सोनं आणि हिऱ्यांची किंमत तर माहीत असेलच. आजकाल हे खरेदी करण्यासाठी आपल्याला भरमसाठ पैसा खर्च करावा लागतो.
3 / 8
पण यापेक्षाही एक इतकी महाग वस्तू जगात आहे जी खरेदी करणं सर्वांना शक्य नाही. ही वस्तू इतकी महागडी आहे की, त्याच्या एक ग्रॅमच्या किंमतीत काही छोटे देश खरेदी केले जाऊ शकतात.
4 / 8
सोनं आणि हिऱ्यांपेक्षा लाख पटीने महाग ही वस्तू आहे एंटीमॅटर. ही जगातली सर्वात महाग वस्तू असल्याचं सांगितलं जातं. याला प्रतिपदार्थही म्हटलं जातं. ही एक अशी वस्तू आहे जी अनेक प्रतिकणांपासून तयार केली जाते.
5 / 8
एंटीमॅटरला पाजिस्ट्रॉन, प्रति-प्रॉटान प्रति-न्यूट्रॉनपासून तयार केलं जातं. याच्या एक ग्रॅमच्या किंमतीत काही छोटे देश खरेदी केले जाऊ शकतात.
6 / 8
brightside.me च्या रिपोर्ट्सनुसार, एंटीमॅटरच्या एका ग्रॅमची किंमत 62.5 ट्रिलियन डॉलर आहे. आता प्रश्न उभा राहतो की, हे इतकं महाग का असतं. तर याचं उत्तर नासाने दिलं आहे.
7 / 8
हे तयार करण्यासाठी फार जास्त खर्च लागतो म्हणून याची किंमत इतकी असते. रिपोर्ट्सनुसार १ मिलिग्रॅम एंटीमॅटर तयार करण्यात १६० कोटी रूपये खर्च येतो. सोबतच हे तयार केल्यावर याच्या सुरक्षेसाठीही खर्च येतो.
8 / 8
ही वस्तू नासासारख्या संस्थेत ठेवली जाते आणि यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या सुरक्षेतून जावं लागतं. काही मोजके लोकच एंटीमॅटरपर्यंत पोहोचू शकतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके