शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डेस्टिनेशन वेडिंग करायचंय? महाराष्ट्रातील 'या' पाच ठिकाणांचा नक्की विचार करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 20:05 IST

1 / 5
सुला वाईन यार्ड: नाशिकमधील सुला वाईनयार्ड डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. मागे वाईनयार्ड आणि डोंगरांची रांग आणि समोर अॅम्फिथिएटर अशा सुंदर वातावरणात संपन्न झालेला विवाह सोहळा नक्कीच अविस्मरणीय ठरु शकतो.
2 / 5
जाधवगड किल्ला: हेरिटेज हॉटेल असलेला राज्यातील हा एकमेव किल्ला आहे. हा किल्ला 320 वर्ष जुना आहे. चार एकरचा लॉन असलेल्या या किल्ल्यावर विवाह सोहळा आयोजित केल्यास त्याला साधारणत: 3 हजार वऱ्हाडी उपस्थित राहू शकतात.
3 / 5
रुस्तिक हॉलिडे: तुरलमधील रुस्तिक हॉलिडे हादेखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक चांगला पर्याय आहे. धामापूर-तुरल रस्त्यावर असणारं रुस्तिक हॉलिडे निसर्गाच्या सान्निध्यात आहे. याठिकाणी साधारणत: 150 ते 160 पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
4 / 5
हिरण्य द लेकसाईड व्हॅली रिसॉर्ट: औरंगाबादमधील दौलताबादमध्ये असलेल्या हिरण्य रिसॉर्टमध्ये मोठा ग्रीन लॉन आहे. या थ्री स्टार रिसॉर्टमधील सोहळ्याला 2 हजार पाहुणे उपस्थित राहू शकतात. डोंगरांचं नयनरम्य दृश्य दिसणाऱ्या 12 आलिशान खोल्या आणि 8 वॉटरसाईड स्विस कॉटेजेस हे या रिसॉर्टचं वैशिष्ट्य आहे.
5 / 5
रॅडिसन ब्ल्यू रिसॉर्ट अँड स्पा: कर्जतमध्ये असणारं रॅडिसन ब्ल्यू रिसॉर्टमध्ये अविस्मरणीय विवाह सोहळा संपन्न होऊ शकतो. या ठिकाणी वधू वरांसह पाहुण्यांसाठी 94 आलिशान खोल्या आहेत. या रिसॉर्टची रचना थाई स्थापत्यशास्त्रानुसार करण्यात आली असून ती अतिशय सुंदर आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMaharashtraमहाराष्ट्रmarriageलग्नTravelप्रवास