शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो! 'या' महालात लपवलंय हिटलरचं तब्बल 28 टन सोनं, सैनिकाच्या डायरीतून झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 2:44 PM

1 / 8
द्वितीय महायुद्धा दरम्यान हिटलरचं 28 टन सोनं पोलंडच्या एका महालात लपवलेलं आहे. हिटलरच्या सेनेत असलेल्या एका सैनिकाच्या डायरीमुळे हा खुलासा झाला आहे. यातून खुलासा झाला आहे की, रशियन सेनेपासून वाचवण्यासाठी खजिना महालात लपवण्यात आला होता.
2 / 8
असे मानले जाते की, पोलंडच्या व्रोकला शहराजवळ असलेल्या होचबर्ग पॅलेसच्या मैदानातील एका विहिरीच्या शॉफ्टखाली सोन्याची छडी, नाणी आणि दागिने 200 फूट खाली गाडून ठेवले आहेत.
3 / 8
पोलिश-जर्मन सिलेसियन ब्रिज फाउंडेशनच्या अभ्यासकांनी दावा केला आहे की, त्यांना हिटलरच्या खाजगी सेनेतील एका सैनिकाची डायरी सापडली आहे. ज्यात लिहिले आहे की, हा खजिना द्वितीय महायुद्धात जर्मनीच्या पराभवाचा अंदाज आल्याने लपवून ठेवला होता.
4 / 8
असेही सांगितले जाते की, हा खजिना पोलंडच्या तत्कालीन शहर ब्रेस्लाउच्या रीचबॅंकमध्ये जमा करायचा होता. पण तसं होऊ शकलं नव्हतं.
5 / 8
असे म्हटले जाते की, 1945 मध्ये द्वितीय महायुद्धावेळी जर्मनीतील अनेक श्रीमंत लोकांनी त्यांच्या किंमती वस्तू रशियाच्या सैनिकांपासून वाचवण्यासाठी जर्मनीतील एसएस सैनिकांकडे सोपविल्या होत्या. जर हा दावा खरा असेल तर या खजिन्याचं मूल्य 1.25 बिलियन यूरोपेक्षा जास्त असू शकतं.
6 / 8
या ठिकाणाची माहिती मिळवणारे पोलिश-जर्मन सिलेसियन ब्रिज फाउंडेशनचे मुख्य रोमन फुरमानी म्हणाले की, ते या तपासाबाबत सरकारवर दबाव टाकण्यासाठी त्यांचा रिसर्च सार्वजनिक करत आहेत.
7 / 8
त्यांनी दावा केला आहे की, हिटलरच्या ज्या सैनिकाची डायरी त्यांना सापडली ती जर्मनीमध्येही प्रमाणित केली आहे. त्यांनी पोलंडच्या संस्कृती मंत्रालयासोबतही या डायरीच्या सत्यतेबाबत संपर्क केला होता. पण काही उत्तर मिळालं नाही.
8 / 8
फुरमानी म्हणाले की, सरकारच्या परवानगीशिवाय आणि आर्थिक मदतीशिवाय असं करणं आमच्यासाठी कठिण होऊ शकतं. सध्या या महालाच्या मालकांनी त्यांना एका निश्चित सीमेपर्यंत खोदकाम करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
टॅग्स :Germanyजर्मनीGoldसोनंhistoryइतिहासResearchसंशोधनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स