भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:29 IST
1 / 5भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे ऑक्सिोओम-४ मोहिमेंतर्गत गेल्या १२ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रामध्ये आहेत. या मोहिमेसाठी २५ जून रोजी स्पेस एक्सच्या फाल्कन ९ या रॉकेटद्वारे ड्रॅगन हे अंतराळ यान शुभम शुक्ला यांच्यासह इतर ४ अंतराळवीरांना घेऊन केनेडी स्पेस सेंटर येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे रवाना झाले होते. दरम्यान, १४ दिवसांनंतर ते मोहीम आटोपून पृथ्वीवर परतणे अपेक्षित आहे. मात्र काही कारणामुळे शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर चार जणांचा पृथ्वीवरील परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 2 / 5शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर चार अंतराळवीरांना १४ जुलैच्या आधी पृथ्वीवर परत आणणे शक्य नसल्याचे युरोपिनय अंतळाळ संस्थेने सांगितले आहे. म्हणजेच शुभांशू शुक्ला यांच्या पृथ्वीवरील घरवापसीला ३ ते ४ दिवस विलंब होऊ शकतो. या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाला होणारा उशीर आणि त्यामागची कारणं काय आहेत, हे आता आपण जाणून घेऊयात. 3 / 5शुभांशू शुक्ला आणि ऑक्सिओम-४ मोहिमेतील इतर अंतराळवीरांच्या पृथ्वीवरील घरवापसीला उशीर होण्यामागे अनेक संभाव्य कारणं आहेत. त्यामध्ये काही तांत्रिक आणि हवामानाशी संबंधित कारणांचा समावेश आहे. 4 / 5ऑक्सिओम-४ मधील अंतराळवीर हे स्पेसएक्सच्या ग्रेस नावाच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर पतरणार आहे. तसेच ही कॅप्सूल अटलांटिक महासागर किंवा मेक्सिकोच्या उपसागरात उतरण्याची शक्यता आहे. मात्र या भागात वेगवाने वारे, पाऊस किंवा वादळ अशी हवामानाची प्रतिकूलता असेल तर इथे ही कॅप्सूल सुरक्षितरीत्या उतरू शकणार नाही. त्यामुळेच युरोपियन अंतराळ संस्था आणि नासाने हवामानाची स्थिती पाहून या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाला १४ जुलैपर्यंत टाळलं जाऊ शकतं. 5 / 5याआधी ऑक्सिओम-१ मोहिमेवेळीही प्रतिकूल हवामानामुळे कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर अधिक दिवस थांबावं लागलं होतं.