शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी २० तरुणांचा बळी; नेपाळमध्ये Gen-Z चे आंदोलन उभारणारा कोण सुदान आहे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:42 IST

1 / 8
काठमांडू आणि नेपाळमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. आतापर्यंत यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी २०० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
2 / 8
हे आंदोलन Gen-Z म्हणजेच १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या तरुणांनी सुरू केले आहे. भ्रष्टाचार आणि फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम सारख्या २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीमुळे तरुण संतप्त आहेत.
3 / 8
नेपाळ सरकारने २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी का घातली असून चिनी अ‍ॅप टिकटॉक यातून सुटले आहे. राजकारण्यांच्या मुलांच्या विलासी जीवनशैलीबद्दलही नाराजी या आंदोलनातून दिसून आली आहे.
4 / 8
आंदोलन करणारे तरुण सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जमान्यात वाढले आहेत. ते फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहेत. म्हणूनच जेव्हा सरकारने यावर बंदी घातली तेव्हा या तरुणांमध्ये सर्वात जास्त नाराजी दिसून आली. आंदोलनात सहभागी विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयीन गणवेश घालून रस्त्यावर उतरले.
5 / 8
नेपाळ सरकारच्या म्हणण्यांनुसार फेक अकाउंट्स अफवा आणि द्वेष पसरवत होते ज्यामुळे सायबर गुन्हे वाढत होते. यासाठी सरकारने कंपन्यांना नेपाळमध्ये नोंदणी करण्यास, स्थानिक प्रतिनिधी आणि तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्यास आणि कंटेंट मॉडरेशनमध्ये करण्यास सांगितले होते. फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि एक्स सारख्या कंपन्यांनी निर्धारित वेळेत नोंदणी केली नाही तेव्हा त्यावर बंदी घालण्यात आली.
6 / 8
या आंदोलनामध्ये सोशल मीडिया आणि 'हामी नेपाल' या स्वयंसेवी संस्थेने मोठी भूमिका बजावली. या स्वयंसेवी संस्थेने विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी इंस्टाग्राम आणि डिस्कॉर्ड सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केला. या साईट्सवर 'हाउ टू प्रोटेस्ट' सारखे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज बॅगा आणि पुस्तके आणण्याचा आणि शाळेचा गणवेश घालून सामील होण्याचा सल्ला देण्यात आला होता.
7 / 8
हामी नेपालचा ३६ वर्षीय संस्थापक सुदान गुरुंग याने ८ सप्टेंबर रोजी काठमांडूमध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. नेपाळमधील शिक्षक भरती घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर सुदान गुरुंग याचे नाव पहिल्यांदा समोर आलं होतं.
8 / 8
भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आणि पैशाच्या आधारे आणि राजकीय संबंधांच्या आधारे नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप गुरुंग याने केला होता. या आरोपानंतर त्याच्यावर कथितपणे प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला होता.
टॅग्स :NepalनेपाळSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी