1 / 9Who is Kamla Persad Bissessar : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज त्रिनिदाद आणि टोबॅगोला पोहोचले. येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी भारत आणि त्रिनिदादमधील खोल संबंधांवर भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी भगवान राम, महाकुंभ आणि तेथील प्रसिद्ध रामलीलेचा उल्लेख केला. यासोबतच पंतप्रधान मोदींनी त्रिनिदादच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर यांना 'बिहार की बेटी' असे संबोधले.2 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरम्यान बिहारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर भर दिला. त्यांनी अनिवासी भारतीयांच्या धाडसाचे कौतुक करताना पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर यांना 'बिहार की बेटी' म्हटले. 3 / 9ते पुढे म्हणाले, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर यांचे पूर्वज बिहारच्या बक्सर येथे राहत होते. कमला स्वतः तिथे गेल्या आहेत. लोक आजही त्यांना बिहारची कन्या मानतात.4 / 9भारतीय वंशाच्या लोकांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, येथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांचे पूर्वज बिहारमधून आले आहेत. बिहारचा वारसा केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 5 / 9कोण आहेत कमला प्रसाद-बिसेसर ? कमला प्रसाद-बिसेसर या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या विद्यमान पंतप्रधान आहेत. त्यांच्या युनायटेड नॅशनल काँग्रेस (UNC) पक्षाचा २८ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे विजय झाला आहे. यापूर्वी २०१० ते २०१५ दरम्यान त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील राहिल्या आहेत. 6 / 9७३ वर्षीय कमला या भारतीय वंशाच्या असून, त्यांचे पूर्वज बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील भेलुपूर गावातील होते. त्यांचे पणजोबा राम लखन मिश्रा यांना १८८९ मध्ये ब्रिटिश राजवटीत त्रिनिदाद येथे करारबद्ध कामगार म्हणून नेण्यात आले होते. कमला नेहमीच तिच्या भारतीय वंशाचे कौतुक करतात. 7 / 9२०१२ मध्ये त्यांनी आपल्या वडिलोपार्जित गाव भेलुपूरलाही भेट दिली होती. त्यावेळी गावात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. कमलांचे भारताशी खूप खोल सांस्कृतिक आणि भावनिक नाते आहे. २०१० मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भगवद्गीते हात ठेवून शपथ घेतली होती. 8 / 9कमला प्रसाद-बिस्सेसर यांनी शिक्षण आणि कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या शिक्षणमंत्री देखील राहिल्या आहेत. त्यांचा राजकीय प्रवास हा भारतीय वंशाच्या महिला जागतिक राजकारणात आपले स्थान कसे निर्माण करू शकतात, याचे उदाहरण आहे.9 / 9कमला प्रसाद-बिस्सेसर हे भारतीय वंशाच्या त्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, ज्यांनी जागतिक राजकारणात आपली खास ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक अनिवासी भारतीयांसाठी ही प्रेरणा आणि अभिमानाची बाब आहे.