कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:49 IST
1 / 7इस्रायल आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स प्रमुख मोहम्मद काझेमी यांचे निधन झाले. आता आयआरजीसीने त्यांच्या नवीन प्रमुखाची घोषणा केली आहे. मोहम्मद काझेमी यांच्या मृत्यूच्या सहा दिवसांनंतर, मेजर जनरल मोहम्मद पाकपूर यांनी जनरल माजिद खादेमी यांची नवीन गुप्तचर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.2 / 7रविवारी मोहम्मद काझेमी आणि त्यांचे दोन गार्ड अधिकारी - हसन मोहघेघ आणि मोहसेन बघेरी यांची हत्या झाली. तर नवनियुक्त खादेमी हे यापूर्वी इराणच्या संरक्षण मंत्रालयातील गुप्तचर सुरक्षा संघटनेचे प्रमुख होते. त्यांनी या सुरक्षा संघटनेत अध्यक्षपदही भूषवले आहे. 3 / 7खादेमी यांना आयआरजीसीमध्ये दीर्घ अनुभव आहे आणि त्यांनी हेरगिरीशी संबंधित अनेक कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयआरजीसी विभागातील बातम्या बाहेर पडू नयेत यासाठी त्यांचे एक विशेष युनिट काम करत असे, ज्याची खूप चर्चा आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या राजकारणातही ते विशेष भूमिका बजावत आहेत.4 / 7माजिद खादेमी यांच्यासाठी हा एक आव्हानात्मक काळ आहे, कारण सध्या इराण अनेक संघर्षांमधून जात आहे. अयातुल्लाह यांचे जीवन आणि त्यांची सत्ता देखील धोक्यात आहे. दुसरीकडे, इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने आणि ट्रम्पच्या विधानांनी इराण घेरला आहे. आज दोन्ही देशांमधील संघर्षाचा आठवा दिवस आहे. दोन्ही सैन्यांनी त्यांचे लष्करी तळ मजबूत केले आहेत.5 / 7खादेमींसाठी हा कठीण काळ असू शकतो, कारण इराणने त्यांचे अनेक बलाढ्य आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी गमावले आहेत, ज्यात आयआरजीसी कमांडर हुसेन सलामी, जनरल मोहम्मद बघेरी आणि जनरल घोलामअली रशीद यांचा समावेश आहे. इस्रायलने इराणच्या नतान्झ आणि फोर्डो अणु केंद्रांवर आणि लष्करी तळांवर हल्ला केला आहे.6 / 7जरी इस्रायली सैन्य सतत इराणवर हल्ले करत आहे आणि त्यांना चकवा देत आहे, तरी नवीन गुप्तचर प्रमुखानंतर थोडे सावध राहणे आवश्यक आहे. 7 / 7आयडीएफने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि म्हटले आहे की - '५ दिवसांत दुसऱ्यांदा, आयडीएफने इराणच्या युद्धकाळातील चीफ ऑफ स्टाफ, राजवटीचा सर्वोच्च लष्करी कमांडर यांना ठार मारले आहे. त्याच वेळी, गुप्तचर माहितीच्या आधारे मध्य तेहरानमध्ये इस्रायली हवाई दलाच्या हल्ल्यात इराणचे सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि खामेनी यांचे जवळचे सशस्त्र सल्लागार अली शादमानी यांचाही मृत्यू झाला आहे.'