शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:46 IST

1 / 10
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत बोलताना ग्लोबल गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह (GGI) चा प्रस्ताव ठेवला आहे. जगात बहुपक्षीय व्यवस्था असली पाहिजे आणि एकाच देशाला सर्वशक्तिमान मानणे चुकीचे आहे असं विधान जिनपिंग यांनी यावेळी केली.
2 / 10
शी जिनपिंग यांनी एससीओ नेत्यांना संबोधित करताना हा प्रस्ताव ठेवला, ज्याला रशियाने लगेच सहमती दर्शविली आहे. याशिवाय भारत देखील यावर सहमत आहे कारण बऱ्याच काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जागतिक संबंध समानतेच्या आधारावर ठरवले पाहिजेत असं म्हणत होते. शी जिनपिंग यांचा हा फॉर्म्युला अमेरिकेला थेट आव्हान आहे जे आजकाल अनेक देशांवर शुल्क लादत आहे.
3 / 10
अमेरिकेने भारतावर सर्वात मोठा कर लादला आहे अशा परिस्थितीत शी जिनपिंग यांचं विधान महत्त्वाचे आहे. जिनपिंग म्हणाले की,'मी तुमच्यासमोर Global Governance Initiative प्रस्ताव देऊ इच्छितो. मी सर्व देशांसोबत काम करण्यास तयार आहे असं त्यांनी सांगितले.
4 / 10
त्याशिवाय हे संबंध समानतेवर आधारित असले पाहिजेत आणि मानवी संस्कृतीचे सामायिक भविष्य निर्माण करण्यासाठी सहकार्याच्या भावनेवर आधारित असले पाहिजेत.' ग्लोबल साऊथसाठी हे गरजेचे आहे. हे व्हिजन जागतिक सुरक्षा आणि आर्थिक व्यवस्थेसाठी देखील महत्त्वाचे आहे असं शी जिनपिंग म्हणाले.
5 / 10
'सर्वप्रथम आपल्याला समानतेच्या आधारावर बोलले पाहिजे. क्षेत्रफळ, क्षमता, संपत्ती काहीही असो, सर्व देशांना समान मानले पाहिजे. जागतिक प्रशासनात प्रत्येकाला निर्णय घेण्याची संधी मिळाली पाहिजे आणि प्रत्येकजण लाभार्थी म्हणून समान असावा असं त्यांनी म्हटलं.
6 / 10
आपल्याला जागतिक संबंधांमध्ये अधिक लोकशाही व्यवस्थेला प्रोत्साहन द्यावे लागेल. याशिवाय विकसनशील देशांना देखील समाविष्ट करावे लागेल. आपण सर्व आंतरराष्ट्रीय नियमांनी बांधील आहोत, परंतु त्यांचे योग्यरित्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार पालन केले पाहिजे असंही त्यांनी सांगितले.
7 / 10
आंतरराष्ट्रीय नियम सर्वांना समान रीतीने लागू केले पाहिजेत. यामध्ये कोणतेही दुहेरी मापदंड नसावेत. काही देश त्यांच्या पद्धतीने नियमांचे पालन करतात आणि ते इतर देशांवर लादण्याचा प्रयत्न करतात. आपण सर्वांनी बहुपक्षीय व्यवस्थेबद्दल बोलले पाहिजे. आपल्याला एकत्रितपणे जागतिक व्यवस्थेबद्दल बोलले पाहिजे असंही चिनी राष्ट्रपतींनी प्रमुख देशांसमोर सांगितले.
8 / 10
शी जिनपिंग यांचा हा फॉर्म्युला भारतासह अनेक देशांना पटवून देणारा आहे परंतु तो निश्चितच अमेरिकेला चिंताग्रस्त करेल, जो आपल्या टॅरिफसमोर सर्व देशांना मनमानी करार करण्यास भाग पाडू इच्छितो. जिनपिंग यांनी मांडलेल्या प्रस्तावावर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनीही उत्तर दिले.
9 / 10
समानतेवर आधारित व्यवस्था असावी या शी जिनपिंग यांच्याशी आम्ही सहमत आहोत. काही देश स्वतःच्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न करत असताना हे महत्त्वाचे आहे. रशिया चीनच्या या प्रस्तावाला पाठिंबा देतो. आम्ही उघडपणे एकत्र आहोत. अशाप्रकारे, भारत, चीन आणि रशियाने उघडपणे अमेरिकेचे नावही घेतले नाही परंतु अप्रत्यक्षपणे अमेरिकेला थेट इशारा दिला.
10 / 10
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चीनमध्येरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पुतिन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये विशेष बैठकही झाली. मात्र यामुळे, आता अमेरिकेला मिरची लागली आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनrussiaरशियाIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिनXi Jinpingशी जिनपिंग